---Advertisement---

Vienna Open: अँडरसनने सेमीफायनलमधून माघार घेतल्याने रुबलेव्हची फायनलमध्ये धडक

On: रविवार, नोव्हेंबर 1, 2020 4:36 PM
---Advertisement---

इर्स्टे बँक ओपन म्हणजेच व्हिएना ओपनच्या उपांत्य सामन्यातून शनिवारी (३१ ऑक्टोबर) दक्षिण आफ्रिकेचा टेनिसपटू केविन अँडरसनने माघार घेतली. त्यामुळे रशियाचा टेनिसपटू एँड्र्यू रुबलेव्हने अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. अँडरसनला उजव्या मांडीमध्ये त्रास होऊ लागल्यामुळे त्याने सामना दुसऱ्या सेटमध्येच सोडण्याचा निर्णय घेतला होता.

सन २०१८ मध्ये ही स्पर्धा जिंकणार्‍या अँडरसनने शनिवारी माघार घेतली तेव्हा पाचव्या मानांकित रुबलेव्हने सामन्यात ६-४, ४-१ अशी आघाडी घेतली होती. या सामन्यादरम्यान अँडरससने सामना सोडण्याआधी मेडिकल टाईमआऊट घेतला होता. पण अखेर त्याने दुसऱ्या सेटमध्ये सामना सोडला. 

रविवारी (१ नोव्हेंबर) अंतिम सामन्यात रुबलेव्ह लोरेन्झो सोनेगोचा सामना करेल. सोनेगोने शुक्रवारच्या उपांत्यपूर्व फेरीत नोवाक जोकोविचचा ६-२, ६-१ असा पराभव केला होता.

या स्पर्धेच्या दुसर्‍या फेरीत रुबलेव्ह विरुद्ध खेळताना पायाच्या दुखापतीने जॅनिक सिनरने देखील तीन सेटदरम्यान सामन्यातून माघार घेतली होती. त्यामुळे रुबलेव्हच्या प्रतिस्पर्ध्याची सामना सोडण्याची ही या आठवड्यातील दुसरी वेळ होती.

वाचा-

-भारतीय टेनिसपटू दिविज आणि रोहन बोपन्ना अस्टाना ओपनमधून बाहेर

-पॅरिस मास्टर्स स्पर्धेतून दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविचची माघार

-जर्मनीची स्टार टेनिसपटू जुलिया जॉर्जेसने वयाच्या ३१ व्या वर्षीच घेतली निवृत्ती

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---