महिला बिग बॅश लीग २०२१ स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेतील पहिल्याच लढतीत सिडनी सिक्सर्स आणि मेलबर्न स्टार्स हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात सिडनी सिक्सर्स संघाने मेलबर्न स्टार्स संघाला ६ गडी राखून जोरदार विजय मिळवला. या सामन्यात सर्वांचेच लक्ष सतरा वर्षीय भारतीय फलंदाज शेफाली वर्मावर होते. दरम्यान ती फलंदाजीमध्ये फ्लॉप ठरली असली, तरी देखील क्षेत्ररक्षण करत असताना असा काही कारनामा केला आहे, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
ही घटना मेलबर्न स्टार्स संघाची फलंदाजी सुरू असताना सहाव्या षटकात घडली. फलंदाज सदर्लंडने सरळ शॉट मारला आणि एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. परंतु चेंडू सरळ शेफाली वर्माच्या हातात गेला होता. ती ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत होती, तिथून तिला एकच यष्टी दिसत होती. तरीदेखील वेळ न घालवता चेंडू पकडला आणि रॉकेट थ्रो मारला. ज्यावेळी चेंडू यष्टीला लागला, त्यावेळी फलंदाज क्रिझमध्ये पोहोचली नव्हती. त्यामुळे पंचांनी तिला बाद घोषित केले.
या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच चाहते तिचे कौतुक करत आहेत आणि तिचा व्हिडिओ शेअर करत आहेत. या सामन्यात अप्रतिम क्षेत्ररक्षण करणाऱ्या शेफाली वर्माकडून येणाऱ्या सामन्यांमध्ये तुफान फटकेबाजी करण्याची अपेक्षा असणार आहे.
What a throw! Welcome to the @WBBL, Shafali Verma 🔥@CommBank | #WBBL07 pic.twitter.com/X6mhtzwUp8
— cricket.com.au (@cricketcomau) October 14, 2021
या सामन्यात सिडनी सिक्सर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मेलबर्न स्टार्स संघाकडून एलिस विलानीने ३१ चेंडूंमध्ये ५४ धावांची खेळी केली होती, तर मेग लॅंनिंगने अवघ्या १७ चेंडूंमध्ये २३ धावांची तुफानी खेळी केली. या खेळीच्या या खेळीच्या जोरावर मेलबर्न स्टार्स संघाला ११ षटक अखेर १ बाद ९९ धावा करण्यात यश आले होते.
या धावांचा पाठलाग करताना सिडनी सिक्सर्स संघाकडून एलिसा हेलीने २७ चेंडूंमध्ये सर्वाधिक ५७ धावांची खेळी केली होती, तर शेफाली वर्मा ८ धावा करत बाद झाली होती. हा सामना सिडनी सिक्सर्स संघाने ६ गडी राखून आपल्या नावावर केला.
महत्त्वाच्या बातम्या-
-खुर्चीवर दोरीने बांधून ठेवलेला दिसला विराट; नेटकरी म्हणे, ‘भारत असाच टी२० विश्वचषक जिंकेल’
-Photo: आयपीएलमधून मिळाला छोटा ब्रेक; बुमराहने पत्नी संजनासह ‘अशा’प्रकारे घालवला वेळ
-‘अरे भावा रामनवमी नाही महानवमी,’ रिषभ पंत ‘असं’ ट्वीट केल्याने झाला ट्रोल