---Advertisement---

परदेशी मैदानांवर यष्टीरक्षक रिषभचाच बोलबाला, ३७ धावांच्या खेळीसह मोडलाय धोनीचा ‘हा’ रेकॉर्ड

rishabh-pant
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याने अल्पावधीतच विशेष कामगिरी आपल्या नावे केली आहे. रिषभने लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात परदेशी भूमीवर १००० कसोटी धावा पूर्ण केल्या आहेत. रिषभ सर्वात वेगाने हा टप्पा गाठणारा यष्टीरक्षक फलंदाज बनला आहे. याबाबतीत त्याने माजी अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनीला मागे टाकले आहे. रिषभने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या भूमीवर शतक देखील झळकावले आहे.

इंग्लंडचा कर्णधार जो रूटने दुसऱ्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. रोहित शर्मा आणि केएल राहुलच्या जबरदस्त शतकी भागीदारीच्या जोरावर भारताने शानदार सुरुवात केली होती. राहुलने शानदार शतक झळकावले तर रोहित ८३ धावा करून बाद झाला होता.

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी फलंदाजीसाठी आलेल्या रिषभ पंतने ५८ चेंडूत ३७ धावा केल्या होत्या. या खेळीदरम्यान त्याने एकूण पाच चौकार लागावले होते. या छोटेखानी खेळीसह तो परदेशी भूमीवर १००० कसोटी धावा करणारा तिसरा यष्टीरक्षक फलंदाज ठरला आहे. यापूर्वी अनुभवी फारुख इंजिनिअर आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी ही कामगिरी केली होती. विशेष बाब अशी की, पंतने या दोघांपेक्षा कमी सामने खेळून ही खास कामगिरी केली आहे.

रिषभने आतापर्यंत केवळ २३ कसोटी सामना खेळले आहेत. या यष्टीरक्षकाच्या खात्यात एकूण १४६५ धावा आहेत, त्यापैकी १००३ धावा भारताबाहेर खेळताना आल्या आहेत. रिषभने २९ डावांमध्ये परदेशी भूमीवर हजार कसोटी धावा करून धोनीला मागे सोडले आहे. माजी कर्णधार धोनीने ३२ कसोटी डावात परदेशातील मैदानांवर १००० धावा फटकावल्या होत्या. त्याचवेळी फारुख इंजिनिअरने ३३ कसोटी डावांमध्ये परदेशी भूमीवर हजार धावा केल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या-

बांगलादेश संघाचा फलंदाजी प्रशिक्षक बनण्यासाठी ‘या’ क्रिकेटरने आपल्या देशातील टीमची सोडली साथ

क्रिकेटर ते प्रशिक्षक बनलेल्या शॉनने निवडला सर्वकालिन वनडे संघ, ‘या’ भारतीयांना दिली जागा

‘धोनी फॅमिली’ची युएईत लँडिग, विमानतळावरील फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---