---Advertisement---

‘नितीन मेनन तुम्हाला सलाम!’,भारतीय पंचाच्या कसोटी मालिकेतील अचूक कामगिरीचे श्रीलंकन दिग्गजाकडून कौतुक

---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात आज (६ मार्च) तिसऱ्याच दिवशी भारताने एक डाव आणि २५ धावांनी विजय साजरा केला. या विजयासह भारताने इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका ३-१ अशा फरकाने जिंकली. या विजयाबद्दल सर्वजण भारतीय संघाचे अभिनंदन करत असताना श्रीलंकेचा माजी खेळाडूने संपूर्ण मालिकेत पंच म्हणून दमदार कामगिरी करणाऱ्या नितीन मेनन यांचे कौतुक केले.

श्रीलंकन खेळाडूने केले मेनन यांचे कौतुक
भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत नितीन मेनन यांनी पंच म्हणून भूमिका पार कौतुकास्पद कामगिरी केली. सर्व सामन्यातील खेळपट्टी फिरकीला मदतगार असतानाही अपवाद वगळता त्यांनी चुकीचा निर्णय दिला नाही.

मेनन यांच्या कामगिरीने खुश होऊन श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू रसेल अर्नोल्ड याने ट्विट करत मेनन यांचे कौतुक केले‌. त्याने लिहिले,
‘नितीन मेनन एक उत्कृष्ट पंच आहेत. त्यांनी संपूर्ण मालिकेत सर्वोत्तम कामगिरी बजावली. माझ्यामते संपुर्ण मालिकेत त्यांची कामगिरी सातत्यपूर्ण राहिली. बॅटच्या आजूबाजूची परिस्थिती कशी होती हे जाणून घेतले तर, त्यांनी हे निर्णय कसे दिले हे समजून येईल. सलाम सर’
अर्नोल्ड व्यतिरिक्त समालोचन करणाऱ्या अनेक समालोचकांनीदेखील मेनन यांच्या कामगिरीचे कौतुक केले होते.

पंचांच्या एलिट गटात समाविष्ट आहेत मेनन
सध्या ३७ वर्षांचे असलेले नितीन मेनन हे एस. व्यंकटराघवन व एस. रवी यांच्यानंतर आयसीसीच्या पंचांच्या एलिट गटात समाविष्ट असणारे केवळ तिसरे भारतीय पंच आहेत. त्यांचे वडील नरेंद्र मेनन हे देखील आंतरराष्ट्रीय पंच होते.
नितीन हे २०१७ पासून आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पंच म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आतापर्यंत ७ कसोटी, २४ वनडे व १६ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात पंच म्हणून काम पाहिले आहे.

हेही वाचा- जगातील सर्वात महागडे अंपायर; पगाराच्या रक्कम ऐकून व्हाल अवाक्

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---