---Advertisement---

धोनी आणि रैनाच्या उपस्थितीत सीएसकेच्या मॅनेजरचा वाढदिवस जोरदार साजरा, पाहा व्हिडिओ

On: सोमवार, ऑगस्ट 23, 2021 1:41 AM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या उर्वरित सामन्यांना येत्या १९ सप्टेंबर पासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी संघांनी युएईला यायला सुरुवात केली आहे. तसेच ज्या खेळाडूंचा विलगीकरणाचा अवधी संपला आहे. त्यांनी सरावाला सुरुवात केली आहे. या यादीत चेन्नई सुपर किंग्ज संघातील खेळाडूंचा देखील समावेश आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या खेळाडूंनी जोरदार सरावाला सुरुवात केली आहे. दरम्यान, सराव करण्यातून वेळ काढून संघातील खेळाडूंनी फ्रेंचायजी मॅनेजर रसेल राधाकृष्णन यांचा वाढदिवस साजरा केला आहे.

चेन्नई सुपर किंग्ज संघाने आपल्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एमएस धोनी,सुरेश रैना आणि संघातील इतर खेळाडू फ्रेंचायजी मॅनेजर रसेल राधाकृष्णन यांचा वाढदिवस साजरा करताना दिसून येत आहेत. धोनी आणि रैना सारख्या अनुभवी खेळाडूंचा नम्र स्वभाव चाहत्यांच्या पसंतीचा ठरतोय. तसेच या व्हिडिओमध्ये एमएस धोनी, बर्थडे बॉयला शुभेच्छा देताना दिसून येत आहे.

यानंतर रसेल राधाकृष्णन यांनी देखील आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर सीएसकेच्या खेळाडूंचे आभार मानले आहे. त्यांनी संघातील खेळाडूंचा फोटो शेअर करत लिहिले की,”तुम्ही दिलेल्या चांगल्या संदेश आणि आशीर्वादांमुळे तुमचे खूप आभार, मी खरंच नशीबवान आहे की, मी हा चांगला दिवस माझ्या भावांसोबत घालवला.” तसेच त्यांनी संघातील खेळाडूंसह एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.(Russell radhakirshnan celebrated his birthday in presence of dhoni and raina)

https://www.instagram.com/p/CS10gITJpMR/?utm_medium=copy_link

इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील सामने युएईमध्ये पार पडणार आहेत. या स्पर्धेतील पहिलीच लढत मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये पार पडणार आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. या संघात वेगवान गोलंदाज जोश हेजलवूडचे पुनरागमन झाले आहे. हेजलवूडचे पुनरागमन झाल्यामुळे चेन्नई सुपर किंग्ज संघाची गोलंदाजी आणखी मजबूत होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

अफगाणिस्तान क्रिकेट संघाच्या कर्णधारासोबत तालिबानच्या नेत्यांनी घेतली भेट; दिले ‘हे’ अश्वासन

‘हे’ खेळाडू राहणार आयपीएल २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातून बाहेर, पाहा संपूर्ण यादी

सारा तेंडुलकरने भाऊ अर्जुनकडे व्हिडिओ कॉलवरच रक्षाबंधनाच्या गिफ्टची मागणी, मुंबई इंडियन्सने शेअर केला खास व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---