---Advertisement---

जोडी जमली! आयपीएल २०२१ मध्ये ऋतुराज-फाफ जोडीच्या नावावर मोठ्या विक्रमाची नोंद

On: शुक्रवार, ऑक्टोबर 15, 2021 10:14 PM
---Advertisement---

शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेचा अंतिम सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. दुबईच्या मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करत असलेल्या चेन्नई सुपर किंग्स संघाला ऋतुराज गायकवाड आणि फाफ डू प्लेसिस यांनी चांगली सुरुवात करून दिली होती. दरम्यान त्यांच्या नावे आयपीएल स्पर्धेतील एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.

या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने नाणेफेक जिंकून चेन्नई सुपर किंग्स संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्स संघाकडून ऋतुराज गायकवाड आणि फाफ डू प्लेसिस यांनी डावाची सुरुवात केली होती. या दोघांवर संघाला चांगली सुरुवात करून देण्याची जबाबदारी होती. ही जबाबदारी योग्यरीत्या पार पाडत, दोघांनी ६१ धावा जोडल्या होत्या. त्यानंतर ऋतुराज गायकवाड बाद होऊन माघारी परतला होता.

ऋतुराज गायकवाड आणि फाफ डू प्लेसिस यांनी ६१ धावांची भागीदारी करताच एकाच हंगामात भागीदारीत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसरे स्थान मिळवले आहे. त्यांनी आयपीएल २०२१ स्पर्धेत भागीदारी करत ७५६ धावा केल्या आहेत.

या यादीत सर्वोच्च स्थानी विराट कोहली आणि एबी डिविलियर्स यांची जोडी आहे. दोघांनी २०१६ मध्ये झालेल्या आयपीएल हंगामात ९३९ धावांची भागीदारी केली होती. तर दुसऱ्या स्थानी डेविड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांची जोडी आहे. दोघांनी २०१९ मध्ये झालेल्या आयपीएल हंगामात ७९१ धावांची भागीदारी केली होती.

आयपीएल स्पर्धेच्या एकाच हंगामात भागीदारीत सर्वाधिक धावा 
९३९ धावा – विराट कोहली आणि एबी डिविलियर्स (२०१६)
७९१ धावा – डेविड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो (२०१९)
७५६ धावा – ऋतुराज गायकवाड आणि फाफ डू प्लेसिस ( २०२१)*
७४४ धावा – शिखर धवन आणि पृथ्वी शॉ (२०२१)
७३१ धावा – शिखर धवन आणि डेविड वॉर्नर (२०१६)

यासह ऋतुराज गायकवाड आणि फाफ डू प्लेसिस यांच्या नावे आणखी एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. या दोघांनी आयपीएल स्पर्धेच्या एकाच हंगामात चेन्नई सुपर किंग्स संघासाठी सर्वाधिक वेळेस ५० पेक्षा अधिक धावांची भागीदारी करण्याचा विक्रम केला आहे. ऋतुराज गायकवाड आणि फाफ डू प्लेसिस यांनी आयपीएल २०२१ स्पर्धेत ७ वेळेस ५० पेक्षा अधिक धावांची भागीदारी केली आहे.

तर या यादीत दुसऱ्या स्थानी मायकल हसी आणि सुरेश रैना यांची जोडी आहे. या दोघांनी २०१३ मध्ये झालेल्या आयपीएल हंगामात ६ वेळेस ५० पेक्षा अधिक धावांची भागीदारी करण्याचा पराक्रम केला होता.

महत्त्वाच्या बातम्या – 

अंतिम सामन्यात प्लेइंग ११ जाहीर करताच, सीएसकेची बाबतीत घडली आजवर न घडलेली गोष्ट

फायनलमध्ये १९२ धावा करुनही चेन्नईसाठी कोलकाताची ‘ही’ आकडेवारी ठरु शकते चिंताजनक

ऐकलंत का! गांगुलीचे पीसीबी अध्यक्षांना आयपीएल फायनल पाहण्यासाठी आमंत्रण, पण…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---