देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळली जाणारी विजय हजारे ट्रॉफी २०२१-२२ स्पर्धा सध्या चांगलीच चर्चेत आहे. या स्पर्धेत युवा खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळत आहे. दरम्यान, लवकरच दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्यासाठी भारतीय वनडे संघाची घोषणा केली जाऊ शकते. या संघात ऋतुराज गायकवाड आणि वेंकटेश अय्यर यांसारखे युवा फलंदाज स्थान मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत, तर आतापर्यंत १७ आंतरराष्ट्रीय शतक झळकावणाऱ्या फलंदाजाला पुन्हा एकदा वाट पहावी लागू शकते.
विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत ऋतुराज गायकवाड आणि वेंकटेश अय्यर यांनी जबरदस्त कामगिरी केली आहे. दोघांनी मिळून धावांचा पाऊस पाडला आहे. ऋतुराज गायकवाडने आतापर्यंत सलग ३ शतके झळकावले आहेत, तर वेंकटेश अय्यरला आतापर्यंत २ शतक पूर्ण करण्यात यश आले आहे. तसेच वेगवान गोलंदाज म्हणून त्याने गडी देखील बाद केले आहेत. त्यामुळे या दोघांना भारतीय संघात स्थान दिले जाऊ शकते.
पण, केएल राहुल आणि रोहित शर्माच्या उपस्थितीत वेंकटेशला सलामीवीर फलंदाज म्हणून स्थान मिळणे थोडे कठीण आहे. त्यामुळे त्याला ५ व्या किंवा ६ व्या क्रमांकावर स्थान दिले जाऊ शकते.
वेंकटेश अय्यरने केरळ संघाविरुद्ध चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना ११२ धावांची खेळी केली होती. त्यानंतर पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने ७१ धावांची तुफानी खेळी केली. तसेच चंदीगढ़ संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने १५१ धावांची तुफानी खेळी केली.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने म्हटले की, “वेंकटेश अय्यर निश्चितच दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. तो प्रत्येक सामन्यात ८ ते ९ षटके गोलंदाजी करतोय. हार्दिक पंड्या अनफिट असताना त्याला संधी देण्याची ही योग्य वेळ आहे.”
1⃣0⃣0⃣ up & going strong! 💪 💪
@ivenkyiyer2512 continues his superb run of form. 👏 👏 #MPvUTCA #VijayHazareTrophy pic.twitter.com/iiow2ATC2n
— BCCI Domestic (@BCCIdomestic) December 12, 2021
तसेच महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करत असलेल्या ऋतुराज गायकवाडने आयपीएल २०२१ स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली होती. हीच कामगिरी त्याने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत देखील सुरू ठेवली आहे. त्याने या स्पर्धेतील सुरुवातीच्या ३ सामन्यात सलग ३ शतके झळकावले आहेत. तसेच त्याने यापूर्वी सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी स्पर्धेतही चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे त्याला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर संधी दिली जाऊ शकते.
1⃣3⃣6⃣ vs Madhya Pradesh
1⃣0⃣0⃣ up & going strong vs Chhattisgarh @Ruutu1331 brings up his second successive ton. 👏 👏 #CHHvMAH #VijayHazareTrophy pic.twitter.com/LUMmgInDi3— BCCI Domestic (@BCCIdomestic) December 9, 2021
चारही सामन्यात शिखर धवन ठरला आहे फ्लॉप
एकीकडे युवा खेळाडू चांगली कामगिरी करताय, तर अनुभवी फलंदाज शिखर धवन पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. शिखर धवनने या स्पर्धेतील ४ सामन्यात ०, १२, १४ आणि १८ धावांची खेळी केली आहे. ज्याप्रकारे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने ईशांत शर्मा आणि अजिंक्य रहाणेला एक संधी दिली आहे. त्यावरून असाही अंदाज व्यक्त होत आहे की, दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर १७ आंतरराष्ट्रीय शतक झळकावणाऱ्या शिखर धवनला देखील एक संधी दिली जाऊ शकते.
महत्वाच्या बातम्या :
जेव्हा एकट्या ‘युनिव्हर्स बॉस’ने ठोकलेले तब्बल १८ गगनभेदी षटकार
आपला जड्डू जगात भारी! माजी प्रशिक्षकाने केली मुक्तकंठाने प्रशंसा
“… म्हणून अश्विनपेक्षा जडेजाला जास्त महत्व मिळते”