Ruturaj Gaikwad : भारतीय क्रिकेट संघाचा युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाड याला श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघात जागा मिळाली नाही. सोशल मीडियावर या गोष्टीची जोरदार चर्चा झाली. यासोबतच भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक व निवड समिती यांना देखील ऋतुराज याला न निवडण्याचे स्पष्टीकरण द्यावे लागले. असे असतानाच आता त्याच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे.
आयपीएलमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर ऋतुराज गायकवाड याची निवड झिम्बाब्वे दौऱ्यावर झाली. या दौऱ्यावर त्याला तीन टी20 सामन्यात फलंदाजी करण्याची संधी मिळाली. यामध्ये त्याने एक अर्धशतक व एक 49 धावांची खेळी केली. त्यानंतर श्रीलंका दौऱ्यावर त्याची निवड होईल अशी अपेक्षा होती. मात्र, सलामीवीर म्हणून शुबमन गिल व यशस्वी जयस्वाल यांना संधी देण्यात आली.
असे असताना आता ऋतुराज याला महाराष्ट्र संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. आगामी रणजी हंगामात तो महाराष्ट्राचे नेतृत्व करेल. केदार जाधव निवृत्त झाल्यानंतर आता ऋतुराज हा महाराष्ट्राचा पूर्णवेळ कर्णधार असणार आहे. त्याच्यासोबत भारतीय संघाकडून खेळलेला राहुल त्रिपाठी यंदा पुन्हा एकदा महाराष्ट्र संघात पुनरागमन करेल. आगामी रणजी ट्रॉफीसाठी महाराष्ट्राच्या संभाव्य 28 खेळाडूंची घोषणा केली गेली.
या अनुभवी जोडी सोबतच महाराष्ट्र संघाची मदार अंकित बावणे, सिद्धेश वीर व अर्शिन कुलकर्णी यांच्यावर असेल. यष्टीरक्षक म्हणून निखिल नाईक, मंदार भंडारी व सौरभ नवले यांना संधी मिळाली आहे. तर फिरकीची बाजू अनुभवी सत्यजित बच्छाव, प्रशांत सोलंकी, विकी ओस्तवाल व हितेश वाळुंज सांभाळतील.
महाराष्ट्राच्या संघात राजवर्धन हंगरगेकर, अझीम काझी व तरणजीत सिंग हे अष्टपैलू दिसून येतील. यासोबतच वेगवान गोलंदाज म्हणून रामकृष्ण घोष, मुकेश चौधरी, मनोज इंगळे व विदर्भाकडून महाराष्ट्राकडे आलेल्या रजनीश गुरबानी यांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
राहुल द्रविड, रवी शास्त्री की गॅरी कर्स्टन, भारताचा सर्वोत्तम प्रशिक्षक कोण? आकडे पाहून बसेल धक्का
अर्शदीप सिंगचं नशीब उजळलं, निवडकर्ते देणार कसोटी मालिकेत मोठी संधी?
एका पाठोपाठ श्रीलंकेला दुसरा झटका! भारतासाठी धोकादायक ठरणारा खेळाडू टी20 मालिकेतून बाहेर