शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये आयपीएल २०२१ स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाने कोलकाता नाईट रायडर्स संघावर २७ धावांनी विजय मिळवला. यासह आयपीएल २०२१ स्पर्धेच्या जेतेपदावर आपले नाव कोरले आहे. दरम्यान, या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा चेन्नई सुपर किंग्स संघाचा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाड ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला.
ऋतुराज गायकवाडने आयपीएल २०२१ स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली. तर चेन्नई सुपर किंग्स संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहचवण्यात आणि जिंकून देण्यात मोलाचा वाटा राहिला आहे. त्याने या स्पर्धेतील १६ सामन्यात ४३.३५ च्या सरासरीने ६३५ धावा केल्या. या दरम्यान त्याने १ शतक आणि ४ अर्धशतक झळकावले.
दरम्यान, ऋतुराज आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात जेतेपद मिळवणाऱ्या संघातून ऑरेंज कॅप मिळवणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी असा कारनामा त्याच्याच संघ सहकारी रॉबिन उथप्पा याने २०१४ मध्ये केला होता. परंतु त्यावेळी रॉबिन उथप्पा कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्व करत होता.
आयपीएल २०१४ मध्ये झालेल्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन्ही संघ आमने-सामने होते. या सामन्यात विजय मिळवून कोलकाताने आपले दुसरे जेतेपद पटकावले होते. या हंगामात रॉबिन उथप्पाने ६४० धावा करत ऑरेंज कॅप पटकावली होती. आयपीएल २०२१ स्पर्धेत रॉबिन उथप्पाने चेन्नई संघाचे प्रतिनिधित्व केले.
आयपीएल स्पर्धेत ऑरेंज कॅप पटकावणारे फलंदाज
२००८ – शॉन मार्श
२००९ – मॅथ्यु हेडन
२०१० – सचिन तेंडुलकर
२०११ – ख्रिस गेल
२०१२ – ख्रिस गेल
२०१३ – मायकल हसी
२०१४ – रॉबिन उथप्पा
२०१५ – डेविड वॉर्नर
२०१६ – विराट कोहली
२०१७- डेविड वॉर्नर
२०१८ – केन विलियमसन
२०१९ – डेविड वॉर्नर
२०२० – केएल राहुल
२०२१ – ऋतुराज गायकवाड*
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल २०२१ अन् टी२० विश्वचषकाच्या विजेत्या संघाच्या बक्षीस रकमेत तब्बल ८ कोटींचा फरक; वाचा आकडा
आयपीएल २०२१ मध्ये ऋतु’राज’! मायकल हसीनंतर ‘ही’ कामगिरी करणारा दुसराच फलंदाज