आयपीएलचा दुसरा सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज संघाची गाडी यंदा डगमगताना दिसत आहे. त्यांना आतापर्यंत हंगामातील ५ पैकी केवळ एकच सामना जिंकण्यात यश आले आहे. यामागचे कारण आहे त्यांच्या खेळाडूंचा खराब फॉर्म. युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाडसह चेन्नईचे इतर खेळाडू या हंगामात लौकिसास साजेसा खेळ दाखवू शकले नाहीत. असे असले तरीही, ऋतुराजने गुजरात टायटन्सविरुद्ध आयपीएल २०२२ हंगामातील पहिलेवहिले अर्धशतक झळकावत विक्रमांचे मनोरे रचले आहेत.
मास्टर ब्लास्टरशी केली ऋतुराजने बरोबरी
सुरुवातीच्या पाचही सामन्यांमध्ये दुहेरी धावसंख्या करण्यासाठीही झगडणारा ऋतुराज (Ruturaj Gaikwad) गुजरातविरुद्ध (Gujrat Titans vs Chennai Super Kings) चांगल्याच फॉर्ममध्ये दिसला. पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात त्याने ४८ चेंडूंमध्ये १५२.०८ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना ७३ धावा फटकावल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ५ षटकार आणि ५ चौकारही निघाले. या दमदार खेळीसह त्याने आयपीएलमधील एका विक्रमात सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) याची बरोबरी (Equals Sachin Tendulkar) केली आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
आयपीएलमध्ये २८ डाव खेळताना ९०० पेक्षा जास्त धावा करणारा ऋतुराज सचिननंतर केवळ दुसराच भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. त्याने आयपीएलमध्ये २८ डावांमध्ये ९४७ धावा केल्या आहेत.
ऋतुराजव्यतिरिक्त अंबाती रायुडूने ४६ धावांची शानदार खेळी खेळली. ३१ चेंडू खेळताना त्याने २ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने या धावा केल्या. तसेच कर्णधार रविंद्र जडेजाने अंतिम षटकांमध्ये झटपट २२ धावांची खेळी करत संघाला १६९ धावांपर्यंत पोहोचवले.
ऋतुराज गायकवाडचे दमदार पुनरागमन
चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आयपीएल २०२१मध्ये चांगल्या फॉर्ममध्ये होता. त्याने १६ सामने खेळताना सर्वाधिक ६३५ धावा चोपल्या होत्या. यासोबतच त्याने ऑरेंज कॅपवर आपले नाव कोरले होते. मात्र, यंदाच्या हंगामातील त्याची काामगिरी खूपच खराब राहिली होती. या हंगामात त्याने ५ सामने खेळले असून त्यात त्याने केवळ ३५ धावा केल्या होत्या. परंतु आता गुजरातविरुद्धची अर्धशतकी खेळी त्याच्यासाठी आत्मविश्वास उंचावणारी ठरेल.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
“जी टीम सलग सहा पराभव स्वीकारते, ती ८ पैकी ८ सामने काय जिंकणार?”, माजी दिग्गजाची मुंबईला चपराक
विजयी षटकारासह सामना खिशात, सनरायझर्स हैदराबादची अनोखी हॅट्रिक; वाचून कराल कौतुक
मयंकच्या अनुपस्थितीत पंजाबचा गेला तोल, हैदराबादने ७ विकेट्सने चारली धूळ; उमरान मलिक ठरला हिरो






