---Advertisement---

IND vs AFG: टीम इंडियामध्ये ऋतुराजची एंट्री, वनडे मालिकेत विराट कोहलीची घेणार जागा!

On: गुरूवार, जून 4, 2026 4:38 PM
---Advertisement---

आगामी अफगाणिस्तान विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी निवडलेल्या भारतीय संघात बदलाची शक्यता आहे. स्टार फलंदाज विराट कोहली दुखापतीमुळे या मालिकेला मुकणार आहे, असे वृत्त समोर येत आहे. बीसीसीआयने हे अधिकृतपणे जाहीर केले नसले तरी त्याला हॅमस्ट्रिंगची गंभीर दुखापत झाल्याचे कळते. त्याच्याजागी ऋतुराज गायकवाडला संधी मिळू शकते. त्याला श्रीलंका दौऱ्यासाठी इंडिया ए संघाचा उपकर्णधार म्हणून निवडले होते, मात्र आता तो अफगाणिस्तान विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात सामील झाल्याची माहिती समोर येत आहे.

विराटच्या जागी ऋतुराज संघात आला तर तो केवळ एक बदली फलंदाजच नाही, तर संघाकडे एक सलामीचा पर्यायही उपलब्ध असेल. आता प्रश्न असा की इंडिया ए संघात त्याची जागा कोण घेणार? त्याच्याजागी रजत पाटीदारला संधी दिली जाईल. इंडिया ए चा हा श्रीलंका ए दौरा 9 जूनपासून सुरू होणार असून त्यामध्ये अफगाणिस्तान ए संघही असणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला सलग दोन आयपीएल विजेतेपद मिळवून दिल्यानंतर पाटीदार सध्या मध्य प्रदेश प्रीमियर लीगमध्ये खेळण्यात व्यस्त आहे.

ऋतुराजने भारतासाठी शेवटचा वनडे सामना 2025 डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. त्याने आतापर्यंत भारतासाठी ९ वनडे सामने खेळले असून त्यात एक शतक आणि एका अर्धशतकासह 28.50 च्या सरासरीने 228 धावा केल्या आहेत. तसेच त्याला भारताच्या वनडे संघात विराटच्या जागी घेतले तरी त्याला अंतिम 11 मध्ये स्थान मिळण्याची शक्यता कमीच आहे. कारण विराट अधिकृतपणे संघाबाहेर राहिला तर ईशान किशन हा पहिला दावेदार आहे.

विराटच्या दुखापतीबद्दल बीसीसीआय जोपर्यंत अधिकृत वैद्यकीय माहिती जाहीर करत नाही, तोपर्यंत दुखापतीची नेमकी तीव्रता अद्याप अस्पष्ट आहे. एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, विराटच्या स्कॅनमध्ये डिस्टल सेमीमेम्ब्रेनस टेंडन फाटल्याचे समोर आले आहे. ही एक दुर्मिळ दुखापत आहे. सहसा हॅमस्ट्रिंग टेंडन फाटण्यासारख्या दुखापतीतून सावरण्यासाठी 3 ते 8 आठवड्यांचा कालावधी लागतो. काही प्रकरणांमध्ये सावरण्याचा हा कालावधी 12 आठवड्यांपर्यंतही लांबू शकतो.

रोहित शर्माही हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून सावरत आहे. तो अद्याप बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलेंसमध्ये पोहोचला नसल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या फिटनेसच्या बाबतीत चिंता असून तो ही अफगाणिस्तान विरुद्धच्या वनडे मालिकेला मुकण्याची शक्यता आहे.

अफगाणिस्तान विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी निवडण्यात आलेला भारतीय संघ –
शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उकर्णधार), केएल राहुल (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, प्रिन्स यादव, गुरनूर ब्रार, हर्ष दुबे. (विराट-रोहित या मालिकेला मुकण्याची शक्यता)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---