---Advertisement---

अखेर प्रतिक्षा संपली! तब्बल 15 महिन्यांनी झाले ऋतुराजचे वनडे पदार्पण

On: गुरूवार, ऑक्टोबर 6, 2022 5:10 PM
Ruturaj-Gaikwad
---Advertisement---

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यानचा पहिला वनडे सामना गुरूवारी (6 ऑक्टोबर) लखनऊच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियमवर सुरू झाला. या मालिकेत भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा याच्या अनुपस्थित शिखर धवन संघाचे नेतृत्व करतोय. या सामन्यात शिखरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचवेळी या सामन्यात भारतीय संघातर्फे युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड याला वनडे पदार्पण करण्याची संधी मिळाली. टी20 पदार्पणानंतर वनडे पदार्पणासाठी त्याला तब्बल 15 महिने वाट पहावी लागली आहे.

https://twitter.com/BCCI/status/1577969773555879937?t=89vu1qoCiSXPDwofZkgxGA&s=19

 

भारताचा प्रमुख संघ टी20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाला रवाना झाल्यानंतर या वनडे मालिकेत युवा भारतीय खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. मागील तीन आयपीएल हंगाम व देशांतर्गत हंगामात सातत्याने धावा काढणारा महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याला देखील या संघात स्थान मिळाले होते. या पहिल्या सामन्यात त्याला वनडे पदार्पणाची संधी देखील देण्यात आली. कर्णधार शिखर धवनच्या हातून त्याला ही कॅप मिळाली. भारतासाठी वनडे क्रिकेट खेळणारा तो 245 वा खेळाडू बनला. त्याच्यासोबतच युवा फिरकीपटू रवी बिश्नोई याला देखील वनडे पदार्पणाची संधी दिली गेली.

ऋतुराजने आतापर्यंत भारतीय संघासाठी 9 टी20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याच्या नावे एका अर्धशतकासह 135 धावा जमा आहेत. त्याने आपला पहिला सामना मागील वर्षी श्रीलंका दौऱ्यावर खेळला होता.

महाराष्ट्रासाठी खेळणारा ऋतुराज हा मागील तीन वर्षात देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडू ठरला आहे. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ससाठी शानदार फलंदाजी करत त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतलेले. त्याच्या नावे प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये 1177, लिस्ट ए क्रिकेटमध्ये 3355 तर टी20 क्रिकेटमध्ये 2541 धावा केल्या आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
INDvSA: ‘विराट कोहली आणि रोहित शर्मा माझे आदर्श’, पहिल्या वनडेपूर्वीच खेळाडूचे मोठे वक्तव्य
पांढरे केस, पांढरे जॅकेट अन् हातात माईक, रिची बेनो बोलायला लागले की, ऐकणाऱ्याचे कान व्हायचे तृप्त

 

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---