चार वेळचा आयपीएल चॅम्पियन असलेल्या चेन्नई सुपर किंग्स संघाने आयपीएल 2023 स्पर्धेत प्ले-ऑफमध्ये एन्ट्री केली आहे. एमएस धोनी याच्या नेतृत्वात चेन्नईने दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्धच्या अखेरच्या साखळी सामन्यात 77 धावांनी दणदणीत विजय मिळवत प्ले-ऑफचे तिकीट खिशात घातले. यासह चेन्नई संघाचा सलामी फलंदाज ऋतुराज गायकवाड याने धोनीच्या निवृत्तीविषयी मोठे भाष्य केले आहे. ऋतुराजने सहकारी डेवॉन कॉनवे याच्याशी बोलताना म्हटले की, धोनी पाच वर्षे आणखी खेळत आहे.
आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच एमएस धोनी आयपीएल निवृत्ती (MS Dhoni IPL Retirement) कधी घेणार याची चर्चा रंगली होती. एमएस धोनी (MS Dhoni) याने स्पर्धेदरम्यान निवृत्तीविषयी संकेत दिले आहेत, पण त्याने संपूर्णपणे काहीच स्पष्ट केले नाहीये. दिल्लीविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यानंतर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याने कर्णधार धोनीविषयी भाष्य केले.
काय म्हणाला ऋतुराज?
ऋतुराज म्हणाला की, “प्रामाणिकपणे सांगतो, मी वास्तवात खूप आभारी आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली मी 50 सामने खेळायला भेटले. जर मी पहिल्या सामन्यापासून हा प्रवास पाहिला, तर त्यांच्यात कोणताच बदल झाला नाही. कोणतेच अंतर नाहीये. ते खूपच नम्र आहेत. चर्चेसाठी नेहमीच तयार असतात. प्रत्येक वेळी, जेव्हाही तुम्ही त्यांच्याकडे जाता. माझ्या मागे त्यांचा आत्मविश्वास आहे आणि मला माहितीये की, ते जे काही सांगत आहेत किंवा जे मला वाटेल ते मी जाऊन काहीही विचारू शकतो. हेच ते आहे, जे मला एक युवा म्हणून मला या वातावरणात हवे होते.”
चेन्नईचा दुसरा सलामीवीर डेवॉन कॉनवे (Devon Conway) यानेही धोनीबाबत भाष्य केले. तो म्हणाला की, “त्यांनी इतके जास्त क्रिकेट खेळले आहे, त्यांचा खूप आदर आहे. जर इतक्या मोठ्या व्यक्तीकडून तुम्हाला पाठिंबा मिळाला आणि ते तुमच्यावर विश्वास ठेवतात, तर यामुळे एक खेळाडू म्हणून तुमचा आत्मविश्वास वाढतो. आशा आहे की, हा त्यांचा शेवटचा हंगाम नसेल.”
‘ते पाच वर्षे आणखी खेळत आहेत’
महेंद्र सिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) याच्याबाबत डेवॉन कॉनवे जे म्हणाला, त्यावर ऋतुराजने प्रतिक्रिया देत म्हटले की, “ते आणखी पाच वर्षे खेळत आहेत.” यावर कॉनवे म्हणाला की, “त्यांच्याकडे कमीत कमी पाच वर्षे आहेत. त्यांचा गुडघा चांगला आहे. त्यांचे असणे खूप चांगले आहे आणि घरच्या मैदानातील चाहते त्यांना पाहण्यासाठी खूप उत्सुक असतील.”
चेन्नई सुपर किंग्स संघ प्ले-ऑफमधील पहिला क्वालिफायर सामना 23 मे रोजी गुजरात टायटन्सविरुद्ध खेळणार आहे. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात विजय मिळवला, तर चेन्नई संघ थेट अंतिम सामन्यात प्रवेश करेल. तसेच, पराभूत झाला, तर त्यांना क्वालिफायर 2 सामना खेळावा लागेल. (ruturaj gaikwad on csk skipper ms dhoni retirement from ipl know more)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ही तर हद्दच! बसमध्ये जात असतानाच चाहत्याने रोहितला मागितली किस, पाहा काय होती ‘हिटमॅन’ची रिऍक्शन
तब्बल 4 वर्षांनंतर रिंकूने केला मोठा विक्रम, रोहित तर सोडाच; धोनी अन् डिविलियर्सलाही टाकलं मागे