वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील बहुप्रतिक्षित सामना भारत विरुद्ध पाकिस्तान असा होईल. हा सामना 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअम मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी वाईट बातमी समोर येत आहे. भारताचा युवा सलामीवीर शुबमन गिल या सामन्यातून बाहेर पडू शकतो. मात्र, त्याचवेळी गिल हा लवकर बरा न झाल्यास त्याच्या जागी बॅकअप सलामीवीर संघात सामील केला जाऊ शकतो.
शुबमन गिल (Shubman Gill) याला डेंग्यू झाला होता, जो अद्याप पूर्णपणे बरा झाला नाहीये. त्यामुळे त्याचे विश्वचषकात खेळणे खूपच कठीण झाले आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी गिल ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या भारताच्या पहिल्या सामन्यातूनही बाहेर पडला होता. माध्यमांतील माहितीनुसार त्याच्या पेशी कमी झाल्या असून त्याला बरे होण्यासाठी आणखी काही काळ लागू शकतात. अशा स्थितीत ईशान किशन हाच पुढील दोन सामन्यात तरी सलामीवीर म्हणून खेळण्याची शक्यता आहे.
गिल लवकर बरा न झाल्यास त्याच्या जागी भारतीय संघ व्यवस्थापन एका बॅकअप सलामीवीराला संघात स्थान देण्याची शक्यता आहे. यासाठी ऋतुराज गायकवाड व यशस्वी जयस्वाल यापैकी एकाची निवड केली जाईल. नुकत्याच संपन्न झालेल्या एशियन गेम्स स्पर्धेत ऋतुराज याच्या नेतृत्वात भारतीय संघाने सुवर्णपदक जिंकले होते. तर यशस्वी याने नेपाळ विरुद्धच्या सामन्यात तुफानी शतकी खेळी केलेली.
ऋतुराज हा मागील तीन वर्षांपासून आयपीएल व देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. तर दुसरीकडे यशस्वी याने मागील दोन वर्षात देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढल्या आहेत. जून महिन्यात वेस्ट इंडीजविरुद्ध कसोटी पदार्पण करताना त्याने दीड शतकी खेळी केली होती. त्यामुळे संघ व्यवस्थापन कोणाची निवड करणार याकडे सर्वांचे लक्ष असेल.
(Ruturaj Gaikwad or Yashasvi Jaiswal could be called as a cover up of Shubman Gill if team management decides to call for a backup)
हेही वाचा-
रूटने घडवला इतिहास, विश्वचषकात ‘असा’ विक्रम करत बनला इंग्लंडचा पहिलाच फलंदाज; वाचाच
बांगलादेशविरुद्ध मलानची तोडफोड फलंदाजी! ठोकले विश्वचषकातील आपले पहिले-वहिले शतक