पुण्यात खेळल्या जात असेल्या महाराष्ट्र प्रीमियर लिगमध्ये ‘पुणेरी बाप्पा’ संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड वेगळ्याच भूमिकेत दिसला. छत्रपती संभाजी किंग्ज विरुद्धच्या सामन्यात ऋतुराजनं चक्क विकेटकीपिंग केली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ऋतुराज गायकवाड विकेटच्या मागे डाईव्ह मारून झेल पकडताना दिसतोय.
आयपीएल 2024 मध्ये धोनीच्या जागी चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार बनलेला ऋतुराज गायकवाड आता धोनीप्रमाणे विकेटकीपिंग देखील करायला लागलाय. त्यामुळे तो आता विकेटमागे देखील धोनीची जागा घेईल, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र याबाबत लगेच कमेंट करणं योग्य नाही. कारण आयपीएल सारख्या स्तरावर विकेटकीपिंग करणं सोपं नाही.
असं नाही की, आयपीएलमध्ये पार्टटाईम विकेटकीपर्सनी विकेटकीपिंग केली नाही. अंबाती रायुडूनं अनेक वर्ष मुंबई इंडियन्ससाठी ही जबाबदारी सांभाळली होती. ऋतुराज गायकवाडचा यष्टीरक्षण करतानाचा व्हिडिओ स्पोर्ट्स 18 नं ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. तुम्ही हा व्हिडिओ येथे पाहू शकता.
Ruturaj Gaikwad 𝙠𝙚𝙚𝙥𝙞𝙣𝙜 𝙩𝙝𝙚 𝙬𝙞𝙘𝙠𝙚𝙩𝙨 for Puneri Bappa 🧤#MaharashtraPremierLeague#JioCinemaSports#MPLonJioCinema #MPLonSports18 pic.twitter.com/4pL4X1k7j5
— Sports18 (@Sports18) June 17, 2024
महाराष्ट्र प्रीमियर लीग 2024 मध्ये ऋतुराज गायकवाडनं फलंदाजीत शानदार कामगिरी केली आहे. त्यानं 8 सामन्यांच्या 7 डावांत 290 धावा ठोकल्या. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 168.60 आणि सरासरी 48.33 एवढी राहिली. त्यानं स्पर्धेत 2 अर्धशतकं देखील ठोकले आहेत.
असं असलं तरी, स्पर्धेत ऋतुराज गायकवाडच्या ‘पुणेरी बाप्पा’ संघाची हालत खराब आहे. टीम गुणतालिकेत अखेरच्या स्थानी आहे. संघानं 8 पैकी फक्त 2 सामन्यात विजय मिळवला, तर 6 सामन्यांत पराभव पत्कारलाय. रत्नागिरी जेट्स संघ 9 पैकी 5 सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
लॉकी फर्ग्युसन टी20 क्रिकेटमध्ये 4 मेडन ओव्हर्स टाकणारा दुसरा गोलंदाज! जाणून घ्या पहिला कोण होता?
टी20 विश्वचषकात निकोलस पूरनचा कहर! एकाच षटकात ठोकल्या 36 धावा, अनेक विक्रम मोडले
“तिथे तुमचा वेळ वाया घालवू नका, भारतात परत या”, हरभजन सिंगचा पाकिस्तानी प्रशिक्षकाला सल्ला