झिम्बाब्वेचा क्रिकेटपटू रायन बर्ल याने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर एक ट्विट करत खळबळ उडवून दिली होती. त्याने ट्विट करत सांगितले होते की प्रत्येक मालिकेनंतर त्यांना बुटांचे सोल चिटकवावे लागतात. या ट्विटसह त्याने त्याच्या बुटांचा फोटोही शेअर केला होता. त्याच्या या ट्विटमुळे लहान देशातील खेळाडूंना मिळणाऱ्या मानधनाचा मुद्दा चर्चेत आला होता.
मात्र या ट्विटवर ‘पुमा’ कंपनीने पुढाकार घेतला. त्याच्या या ट्विटनंतर २४ तासांच्या आतच पुमा कंपनीने (PUMA) त्याला प्रतिक्रिया देत स्पॉन्सरशीप देण्याचे आश्वासन दिले होते. इतकेच नाहीतर दिलेला शब्द पाळत पुमा कंपनीने फक्त रायन बर्लच नव्हे तर संपूर्ण झिम्बाब्वे संघासाठी बूट पाठवले. मात्र आता आता हे ट्विट रायन बर्लला चांगलेच महागात पडण्याची शक्यता आहे.
रायन बर्लवर कारवाई होण्याची शक्यता
या सगळ्या प्रकरणात आता रायन बर्लवरच कारवाई होण्याची शक्यता आहे. झिम्बाब्वे क्रिकेट बोर्ड त्याच्यावर कारवाई करण्याची शक्यता आहे. ज्याचा परिणाम त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीवर देखील होण्याची शक्यता आहे. स्थानिक पत्रकाराने दिलेल्या माहितीनुसार झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाचे पदाधिकारी त्याच्यावर नाराज आहेत.
या पत्रकाराने ट्विट करत म्हंटले, “माझ्या माहितीनुसार झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाचे पदाधिकारी रायन बर्लवर नाराज आहेत. त्यांना वाटते आहे की या सगळ्या प्रकरणामुळे बोर्डाची प्रतिमा खराब झाली आहे. या सदस्यांनी रायन विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली आहे. असे झाले तर झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाकडून हे फार मोठे पाऊल ठरेल. त्याच्यावर आडमार्गाने कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. बहुतेक त्याला संघातून बाहेर केल्या जाऊ शकते. मला आशा आहे की ही माझी भाकीते चुकीची ठरतील.”
थोडक्यात या ट्विटची रायन बर्लला मोठी किंमत चुकवावी लागेल, अशी चिन्हे आहेत. आता आगामी काळात काय घडामोडी घडतात, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असेल.
महत्त्वाच्या बातम्या –
सागरिका घाटगेबरोबर लग्न होण्यापूर्वी ‘या’ अभिनेत्रीसोबत झहीर खानचे तब्बल ७ वर्षे होते प्रेमसंबंध
“मी तिचा मालक नाही”, पत्नी बरोबरच्या फोटोमुळे ट्रोल करणाऱ्यांना इरफानने सुनावले खडेबोल
“पूर्वी १० पैकी ९ युवा खेळाडूंना विराट, सचिन किंवा धोनी बनायचे होते, पण आता बुमराह, शमी झाले आदर्श”