ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज रायन हॅरिस याची आयपीएलच्या १३ व्या मोसमासाठी दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. हॅरिस आयपीएल २०२० मध्ये दिल्लीच्या गोलंदाजांना मार्गदर्शन करताना दिसेल. मागील दोन वर्ष दिल्लीच्या गोलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका निभावणाऱ्या जेम्स होप्सने वैयक्तिक कारणांमुळे यावर्षी आयपीएलमधून माघार घेतली आहे.
दिल्ली कॅपिटल्ससोबत करारबद्ध झाल्यानंतर हॅरिसने प्रतिक्रिया देताना म्हटले, “आयपीएलमध्ये परत आल्याचा मला आनंद आहे. दिल्लीला आयपीएलची प्रतिष्ठित ट्रॉफी मिळवून देण्यास मी १००% योगदान देईल. दिल्ली कॅपिटल्स संघाच्या गोलंदाजीची फळी उत्तम आहे आणि मी त्या सर्व गोलंदाजानांसोबत काम करण्यासाठी उत्साही आहे.”
An impressive former fast bowler to coach an impressive current bowling line-up 🤩
It's a win-win for both, isn't it? 😉#WelcomeRyan #YehHaiNayiDilli pic.twitter.com/J9jolQzzgQ
— Delhi Capitals (@DelhiCapitals) August 25, 2020
संपूर्ण कारकिर्दीत दुखापतींचा सामना करत असतानाही हॅरिसने प्रभावी कामगिरी केली होती. त्याने २७ कसोटी आणि २१ एकदिवसीय सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करताना अनुक्रमे ११३ आणि ४४ बळी मिळवले. ३ आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये त्याच्या नावे ४ बळींची नोंद आहे.
हॅरीसला आयपीएलचा देखील भरपूर अनुभव आहे. २००९ मध्ये आयपीएलच्या दुसऱ्या हंगामात विजेतेपद मिळवणाऱ्या डेक्कन चार्जर्स संघाचा तो प्रमुख खेळाडू होता. आर.पी सिंग व प्रज्ञान ओझा यांच्यासमवेत हॅरिसने डेक्कन चार्जर्सच्या गोलंदाजीचे नेतृत्व केले होते. त्यानंतर, २०११-२०१३ अशी तीन वर्ष तो किंग्स इलेव्हन पंजाब संघाचा सदस्य होता
निवृत्तीनंतर, प्रशिक्षक म्हणून देखील हॅरिसने चांगले नाव कमावले आहे. ऑस्ट्रेलियातील नॅशनल क्रिकेट सेंटरचे संचालकपद व ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षकपद त्याने भूषवले आहे. बिग बॅशमध्ये ब्रिस्बेन हिट तर आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाब संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकाचे काम हॅरिसने पाहिले आहे.
२०२० आयपीएल हंगामात रिकी पाँटिंग, मोहम्मद कैफ, सॅम्युअल बद्री व विजय दहिया यांच्यासमवेत तो आता दिल्लीच्या प्रशिक्षण विभागाचा सदस्य असेल.
महत्त्वाच्या बातम्या –
चाहत्यांना पराभव लागला जिव्हारी; पेटवून दिली कार, १४८ जणांना झाली अटक
राजवाड्यासारखे आहे रैनाचे घर, किंमत ऐकून तुम्हीही व्हाल अवाक्
ट्रेंडिंग लेख –
पंतप्रधानाच्या हत्येमुळे भारतीय संघाला सोडावा लागला पाकिस्तान दौरा अर्ध्यावर
जेव्हा एका कैद्याच्या समर्थनार्थ चक्क खेळपट्टीवर खड्डे करून भरण्यात आले होते तेल…
आयपीएलमधील ३ ताबडतोड फलंदाज, पण शतक मात्र नाही नशिबी