न्यूझीलंडविरुद्धच्या बंगळुरू कसोटीत भारतीय संघाला 8 विकेट्सने दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. परिणामी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. आता उभय संघांमधील दुसरा कसोटी सामना पुण्यात होणार आहे. 24 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबर दरम्यान दोन्ही संघ पुण्यात आमनेसामने येतील. पुणे कसोटी जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरेल. तत्पूर्वी भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनबाबत मोठी बातमी समोर येत आहे.
पुणे कसोटी सामन्यातून सरफराज खान याला वगळले जाऊ शकते. शुबमन गिल फिट झाल्यानंतर सरफराजला बाकावर बसवत केएल राहुलला प्लेइंग इलेव्हनमध्ये कायम ठेवले जाऊ शकते.
सरफराज खानने बेंगळुरू कसोटीत शानदार शतक झळकावले होते. असे असूनही, सरफराज खानला पुणे कसोटीत प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसावे लागू शकते. सरफराज खानच्या जागी केएल राहुलला प्लेइंग इलेव्हनमध्ये महत्त्व मिळू शकते. भारताचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोशेट यांनी सांगितले की, संघ व्यवस्थापन केएल राहुलबाबत घाईघाईने निर्णय घेण्याच्या मनस्थितीत नाही. केएल राहुलला संजू सॅमसनप्रमाणे जास्तीत जास्त संधी मिळाव्यात अशी भारतीय मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरची इच्छा आहे.
‘केएल राहुलच्या फलंदाजीबाबत अडचण नाही…’
याबाबत बोलताना रायन टेन डोशेटने सांगितले की, “सरफराज खानने शेवटच्या कसोटीत शानदार शतक झळकावले. यानंतर मी केएल राहुलकडे गेलो. मी त्याला सांगितले की तू किती डॉट बॉल खेळलास, तसेच तू किती चेंडूंवर फलंदाजी केलीस. केएल राहुलच्या फलंदाजीत काही अडचण नाही, तो शानदार फलंदाजी करतो आहे, तो चांगल्या मानसिकतेने खेळत आहे. आमच्याकडे 6 ठिकाणांसाठी 7 सर्वोत्तम पर्याय आहेत, आम्ही खेळपट्टी आणि परिस्थितीनुसार निर्णय घेऊ, आमची प्लेइंग इलेव्हन कशी असेल? ते परिस्थितीनुसार ठरेल.”
हेही वाचा-
फक्त रिषभ पंतच नाही, तर हे 6 खेळाडू देखील झालेत 99 धावांवर बाद!
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय सलामीवीरांची यादी (टाॅप-5)
कॉमनवेल्थ गेम्स 2026 साठी मोठा निर्णय, क्रिकेट आणि हॉकीसह या खेळांवर बंदी..!