भारतीय संघाने एमएस धोनीच्या नेतृत्वात आयसीसीच्या पहिल्या-वहिल्या टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले होते. या विश्वचषक विजयाला आज 15 वर्ष पूर्ण झाले आहेत आणि संघ यावर्षी पुन्हा एखदा ही कामगिरी करण्याच्या प्रयत्नात असेल. मागच्या वर्षी यूएईत खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषकात भारत ग्रुप स्टेजनंतर बाहेर पडला होता, पण यावर्षी संघ चांगली प्रदर्शन करेल, अशी सर्वांचीच अपेक्षा आहे. भारताचा माजी वेगवान गोलंदाज एस श्रीसंत याने देखील अशीच अपेक्षा व्यक्त केली आहे.
भारत दुसऱ्यांचा बनणार टी-20 विश्वचषक चॅम्पियन –
भारतीय संघाने 2007 साली टी-20 विश्वचषक जिंकला, त्यामध्ये श्रीसंतचे योगदान महत्वाचे होते. त्याने पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात भारतीय संघासाठी शेवटचा झेल पकडला होता. आता एस श्रीसंत (S Shreesanth) याने अपेक्षा व्यक्त केली की, भारत यावर्षीचा टी-20 विश्वचषक देखील जिंकेल. संघात ही कामगिरी करण्यासाठी सर्व गुणवत्ता आहे, असेही त्याला वाटते. रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वात भारतीय संघ यावर्षी नक्कीच त्यांचा दुसरा टी-20 विश्वचषक जिंकू शकतो.
माध्यमांशी बोलताना एस श्रीसंत म्हणाला की, “2007 मध्येही असेच वातावरण होते. जसे की आत्ता आहे. त्यावेळीही संघ अनेक अडचणींमधून जात होता. एमएस धोनी संघाचा नवीन कर्णधार होता आणि संघात अनेक युवा खेळाडूंना समील केले गेले होते. भारत आशिया चषकात मिळालेल्या पराभवाला विश्वचषक विजयात बदलण्याचा प्रयत्न करेल आणि यात यशस्वी देखील होईल.”
दरम्यान, आयसीसीच्या 2007 सालच्या टी-20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघ आमने सामने आले होते. भारताने या महत्वाच्या सामन्यात 5 धावांच्या अंतराने विजय मिळवला. मिस्बाह उल हक पाकिस्तानला या सामन्यात विजय मिळवून देऊ शकत होता. पण शेवटच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर श्रीसंतने त्याचा झेल पकडून पाकिस्तानला सर्वबाद केले आणि भारताला पहिला टी-20 विश्वचषक जिंकवून दिला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
आफ्रिदीने दाखवून दिला पीसीबीचा फाटका खिसा; शाहीनला उपचारासाठी मिळाली नाही बोर्डाची मदत
सामन्यात खेळाडूंशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानच्या आसिफ अलीने चाहत्याशीही घातली हुज्जत, व्हिडिओ होतोयं व्हायरल
‘तुम्ही चीफ नाही, चीप आहात,’ पाकिस्तानी क्रिकेटरची निवड समितीवर कडाडून टीका