विविध टी20 लिग मुळे क्रिकेटमधील हा सर्वात लहान फाॅरमॅट आता जगातील कानाकोपऱ्यात पोहचला आहे. ज्यात दक्षिण आफ्रिका कसे मागे राहील. 2023 पासून आफ्रिकेतही फ्रँचायझी क्रिकेट लीग सुरू झाली. या लीगचे नाव SA20 आहे आणि सध्या त्याचा तिसरा हंगाम सुरू आहे. 10 जानेवारी रोजी तिसऱ्या हंगामातील दुसरा सामना डर्बन सुपर जायंट्स आणि प्रिटोरिया कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. ज्यामध्ये डर्बन संघाने रोमांचक विजय मिळवला आणि सामना 2 धावांनी जिंकला. या सामन्यात न्यूझीलंडचा दिग्गज खेळाडू केन विल्यमसनने शानदार अर्धशतकी खेळी केली आणि त्याने मारलेल्या षटकारामुळे एका चाहत्याला भाग्यवान बनवले आणि त्याने जवळजवळ 90 लाख रुपये जिंकले. हे कसे शक्य झाले असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, चला तर मग पाहुयात नेमकं काय प्रकरण आहे.
इथन बॉश डर्बन सुपर जायंट्सच्या डावातील 17 वे षटक टाकत होता. षटकातील तिसरा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर होता, ज्यावर केन विल्यमसन गुडघ्यावर बसून डीप मिड विकेटवर मोठा शॉट खेळला आणि चेंडू थेट चाहत्यांमध्ये गेला. चाहत्याने या संधीचा फायदा घेतला आणि एका हाताने एक शानदार झेल घेतला. त्या शॉटमुळे विल्यमसनला 6 धावा मिळाल्या पण चाहत्याने 90 लाख रुपये जिंकले.
खरंतर, ‘बेटवे’ हा दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या SA20 लीगचा प्रायोजक आहे आणि ‘बेटवे कॅच अ मिलियन’ हा स्पर्धेचा एक भाग आहे. यानुसार, जर मैदानातील 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या कोणत्याही चाहत्याने एका हाताने चेंडू पकडला तर त्याला बक्षीस म्हणून 10 लाख रँड मिळतील. ज्याची किंमत भारतामध्ये 45 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. त्याच वेळी, जर चाहता सामन्यापूर्वी बेटवेचा ग्राहक असेल तर त्याची बक्षीस रक्कम दुप्पट केली जाईल. यामुळे, या चाहत्याला 20 लाख रँड मिळतील, जे भारतीय रुपयांनुसार 90 लाख रुपये आहे. आशाप्रकारे त्याला 90 लाख रुपयांचे बक्षिस मिळाले.
You’ll want to stick around to the end for this one… 👀
We’ve got another @Betway_za Catch 2 Million WINNER! 💰🎉#BetwaySA20 #DSGvPC #WelcomeToIncredible pic.twitter.com/hDYH4HKYVs— Betway SA20 (@SA20_League) January 10, 2025
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, हा सामना खूप रोमांचक होता आणि शेवटच्या चेंडूवर डर्बन सुपर जायंट्सने 2 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना, डर्बनने 20 षटकांत 4 गडी गमावून 209 धावा केल्या, ज्याचा पाठलाग करताना प्रिटोरिया कॅपिटल्सना फक्त 207/6 धावाच करता आल्या.
हेही वाचा-
कसोटीत सर्वाधिक चेंडू खेळण्याचा विक्रम, खेळाडू ते प्रशिक्षक असा होता ‘राहुल द्रविड’चा अद्भुत प्रवास
बीसीसीआयचा यु-टर्न, इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेबाबत अचानक घेतला मोठा निर्णय
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पूर्वी मोठी अपडेट, या दिवशी होणार टीम इंडियाची घोषणा