---Advertisement---

अक्षर पटेल बनला ‘सुपरमॅन’, हवेत उडी मारून घेतला अप्रतिम झेल; पाहा VIDEO

---Advertisement---

अक्षर पटेल आतापर्यंत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आपली छाप सोडण्यात अपयशी ठरला आहे. मात्र भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात सेंच्युरियनमध्ये सुरू असलेल्या तिसऱ्या सामन्यात अक्षर पटेलने उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा जबरदस्त नमुना सादर केला. त्याने हवेत उडी मारली आणि डेव्हिड मिलरचा अविश्वसनीय झेल घेतला. ज्याने सगळेच थक्क झाले. या कॅचच्या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

हा किस्सा दक्षिण आफ्रिकेच्या डावाच्या 16 व्या षटकात घडला. हार्दिक पांड्याच्या चेंडूवर मिलरने चेंडू शानदारपणे उचलून डीप मिड-विकेटच्या दिशेने हवेत खेळला. हा फटका इतका कठीण होता की सहज चेंडू सीमारेषा बाहेर जाईल, असे वाटत होते, मात्र अक्षर पटेलने उत्कृष्ट टायमिंगने हवेत उडी मारत चेंडू पकडला. अक्षर पटेलच्या हातात हा चेंडू कसा अडकला हे कदाचित त्यालाही कळले नसेल.

पाहा व्हिडिओ-

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम खेळणाऱ्या भारताला पहिल्याच षटकात मोठा धक्का बसला. स्टार फलंदाज संजू सॅमसन आपले खातेही उघडू शकला नाही आणि सलग दुसऱ्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला. मात्र, यानंतर अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा यांनी प्रोटीज गोलंदाजांची खरडपट्टी काढली. या दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी झाली. अभिषेकने 50 धावा केल्या. त्याचवेळी तिलकने नाबाद 107 धावा केल्या. ज्यात त्याने 8 चौकार आणि 7 षटकार मारले. या डावांच्या बळावर भारताला 6 गडी गमावून 219 धावा करण्यात यश आले.

काउंटर इनिंगमध्येही दक्षिण आफ्रिकेने सामना जिंकण्यासाठी कडवी झुंज दिली. हेनरिक क्लासेन आणि मार्को जॅनसेन यांनी भारतीय गोलंदाजांविरुद्ध अनेक मोठे फटके खेळले. क्लासेनने 22 चेंडूत 41 धावा केल्या. तरमार्कोने 17 चेंडूत 54 धावा केल्या. संपूर्ण षटके खेळल्यानंतर प्रोटीज संघाला 7 गडी गमावून 207 धावा करता आल्या. आशाप्रकारे भारताला 11 धावांनी विजय मिळाला.

हेही वाचा-

रमणदीप सिंगचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झंझावाती पदार्पण, डेब्यूमध्ये अशी कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्याची प्लॅनिंग कोणाची? सामन्यानंतर मोठा खुलासा
IND VS SA; भारतीय संघाने रचला इतिहास; टी20 क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा पहिलाच संघ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---