Sunil Gavaskar Advice to Rohit Sharma: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेला सुरुवात होण्यासाठी एक दिवसाची वाट पाहावी लागणार आहे. 26 डिसेंबरपासून सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्क येथे उभय संघ पहिल्या कसोटी सामन्यात भिडणार आहेत. मात्र, या सामन्यापूर्वीच भारतीय संघाचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनी रोहित शर्मा याला मोलाचा सल्ला दिला आहे. कारण, रोहित विश्वचषकानंतर थेट कसोटी मालिका खेळणार आहे.
‘रोहित एका दिवसात 150 धावा करू शकतो’
सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांच्या मते, रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्यापुढे या सामन्यात अनेक आव्हाने असतील. कारण, त्याला स्वत:ला मानसिकरीत्या कसोटी सामन्यांसाठी तयार करावे लागेल. गावसकरांनी स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हटले की, “सर्वात पहिली गोष्ट म्हणजे, रोहितसाठी सर्वात मोठे आव्हान हे असेल की, तो स्वत:ला कसोटी सामन्यासाठी मानसिकरीत्या तयार कसे तयार करतो. तो वनडे क्रिकेटमध्ये फलंदाजी करत होता. वनडेत तो आक्रमक फलंदाजी करत होता. तो जास्तीत जास्त धावा पॉवरप्लेमध्ये बनवण्याचा प्रयत्न करत होता. वनडे विश्वचषकादरम्यानही तो असाच खेळत होता.”
“मात्र, कसोटी क्रिकेटसाठी त्याला आपला अप्रोच पूर्णपणे बदलावा लागेल. कारण, त्याला या हिशोबाने विचार करावा लागेल की, पूर्ण दिवस फलंदाजी करायची आहे. जर त्याने पूर्ण दिवस फलंदाजी केली, तर त्याच्याकडे ज्याप्रकारचे शॉट्स आहेत, तो 150 धावा करू शकतो. तसेच, भारतीय संघ 300-350 पेक्षा जास्त धावा बनवेल.”
मालिकेविषयी थोडक्यात
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात 26 डिसेंबरपासून दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. भारतीय संघ सध्या या मालिकेसाठी तयारी करण्यात व्यस्त आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली या मालिकेत मैदानावर पुनरागमन करत आहेत. भारतापुढे दक्षिण आफ्रिकेला त्यांच्याच मायदेशात कसोटीत पराभूत करण्याचे सर्वात मोठे आव्हान असेल. आतापर्यंत भारतीय संघ कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला त्यांच्या मायदेशात एकदाही पराभूत करू शकला नाहीये. (sa vs ind captain rohit sharma has to change his approach completely says legendary cricketer sunil gavaskar)
हेही वाचा-
BREAKING: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे आणि टी20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी
हिट विक्रम । रोहितला सर्वात मोठा विक्रम मोडण्याची संधी; सेहवागच नाही, तर धोनीलाही टाकू शकतो मागे