Tilak Varma On India’s Defeat: 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत भारतीय संघ 0-1ने पिछाडीवर पडला आहे. मंगळवारी (दि. 12 डिसेंबर) केबेरहा येथील सेंट जॉर्ज पार्क येथे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात दुसरा टी20 सामना खेळला गेला. या सामन्यात भारताचा 5 विकेट्सने पराभव झाला. भारताचा मधल्या फळीतील फलंदाज तिलक वर्मा याने भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात मिळालेल्या पराभवाचे मोठे कारण सांगितले आहे.
काय म्हणाला तिलक?
युवा विस्फोटक फलंदाज तिलक वर्मा (Tilak Varma) याच्यानुसार, पावसामुळे चेंडू खूपच ओला झाला होता. त्यामुळे गोलंदाजांसाठी तो व्यवस्थित पकडणे खूपच कठीण जात होते. सामन्यानंतर माध्यमांशी बोलताना तिलकने भारताच्या पराभवाविषयी विधान केले. तो म्हणाला, “मला वाटते की, पॉवरप्लेमध्ये आम्ही जरा जास्त धावा खर्च केल्या. मात्र, त्यानंतर आम्ही जबरदस्त पुनरागमन केले. मात्र, चेंडू ओला असल्या कारणामुळे आम्ही जितका विचार केला होता, तितका योग्यप्रकारे तो पकडता येत नव्हता.”
सामन्यात 20 चेंडूत 29 धावांची खेळी करणारा तिलक पुढे बोलताना तो म्हणाला की, “आम्ही सर्व कंडीशन्ससाठी पूर्णपणे तयार आहोत आणि वास्तवात आम्ही कठीण परिस्थितीत चांगली फलंदाजी केली. सलामीवीर फलंदाज या सामन्यात फ्लॉप राहिले, पण मी आणि सूर्याने आणि नंतर रिंकू सिंग याने शानदार फलंदाजी केली. आम्ही जेव्हा फलंदाजी केली, तेव्हा खेळपट्टी संथ होती आणि चेंडूला ग्रिप मिळत होती. एडेन मार्करम आणि तबरेज शम्सीने दक्षिण आफ्रिकेसाठी चांगली गोलंदाजी केली होती.” खरं तर, भारताचे सलामीवीर यशस्वी जयसवाल आणि शुबमन गिल दोघेही शून्यावर बाद झाले होते.
दक्षिण आफ्रिका संघाचा सहज विजय
दक्षिण आफ्रिका संघाने दुसऱ्या टी20 सामन्यात भारतीय संघाला डकवर्थ लुईस नियमानुसार 5 विकेट्सने पराभूत केले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 19.3 षटकात 7 विकेट्स गमावत 180 धावा केल्या होत्या. पावसाच्या व्यत्ययामुळे 3 चेंडू टाकता आले नाहीत. अशात डकवर्थ लुईस नियमानुसार यजमान संघाला विजयासाठी 15 षटकात 152 धावांचे आव्हान मिळाले. या आव्हानाचा पाठलाग त्यांनी 13.5 षटकात 5 विकेट्स गमावत केला आणि मालिकेत 1-0ने आघाडी घेतली. (sa vs ind cricketer tilak varma reveals the reason behind india defeat in 2nd t20i)
हेही वाचा-
टीम इंडियाच्या ‘या’ गोलंदाजाबाबत दिग्गजाचं मोठं विधान; म्हणाला, ‘आयपीएलपासूनच त्याची…’
दु:खद! न्यूझीलंडचा दिग्गज हरपला, क्रिकेटविश्व शोकसागरात