---Advertisement---

IND vs SA: दुसऱ्या कसोटी विजयासाठी केएल राहुल नेटमध्ये गाळतोय घाम, पाहा व्हिडिओ

On: रविवार, डिसेंबर 31, 2023 9:23 AM
kl-Rahul
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाला दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात एक डाव आणि 32 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर आता भारतीय संघ आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 3 जानेवारीपासून दुसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना केपटाऊनमध्ये होणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल जोरदार तयारी करत आहे. त्याच्या सरावाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

केएल राहुल (KL Rahul) याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये केएल राहुल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी मैदानावर घाम गाळताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तो फलंदाजी करताना एकामागून एक जबरदस्त शॉट मारताना दिसत आहे. फलंदाजीसोबतच केएल राहुल यष्टिरक्षणाचा सरावही करताना दिसतोय. राहुलच्या सरावाचा व्हिडीओ चाहत्यांनाही खूप आवडला आहे. त्याच्या सरावाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांना आशा आहे की, केएल राहुलची बॅट दुसऱ्या सामन्यातही चांगली कामगिरी करेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by KL Rahul???? (@klrahul)

 

पहिल्या कसोटी सामन्यात केएल राहुलची बॅट चांगली बोलली होती. पहिल्या डावात शतक झळकावणारा तो भारताकडून एकमेव फलंदाज होता. त्याने भारतासाठी पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 101 धावांची शानदार खेळी केली. केएल राहुलला पहिल्या डावात इतर कोणत्याही फलंदाजाची साथ मिळाली नाही. या शतकासह, तो सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीनंतर दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर एक किंवा अधिक शतके करणारा तिसरा फलंदाज ठरला. आता दुसऱ्या सामन्यात केएल राहुलची बॅट कामी येते की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. (KL Rahul sweating it out in the nets for the second Test watch the video)

हेही वाचा

Ashwin vs Gill: गिलपेक्षा अश्विनचे ​​कसोटीमधील फलंदाजीचे आकडे सरस, पाहून तुम्हालाही बसेल धक्का
रिचा घोषची एकाकी झुंज अपयशी, अवघ्या तीन धावांच्या विजयासह मालिका ऑस्ट्रेलियाच्या खिशात

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---