दक्षिण अफ्रिका आणि भारत यांच्यातील एकदिवसीय मालिकेची सुरुवात बुधवारी (१९ जानेवारी) झाली. मालिकेतील पहिल्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने ३१ धावांनी विजय मिळवला. भारताचा नियमित एकदिवसीय कर्णधार रोहित शर्मा दुखापतीमुळे दक्षिण अफ्रिका दौऱ्यात सहभागी होऊ शकला नाही. त्याच्या जागी केएल राहुल भारताचे नेतृत्व करत आहे. दौऱ्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात पराभव मिळाल्यानंतर केएल राहुलने महत्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे.
सामना संपल्यानंतर कर्णधार केएल राहुल म्हणाला की, “हा एक चांगला सामना होता. यातून आम्हाला खूप काही शिकायला मिळाले. आम्ही सुरुवात चांगली केली होती. मात्र, मधल्या षटकात आम्ही विकेट्स घेऊ शकलो नाहीत. आम्हाला पाहावे लागेल की, मधल्या षटकांमध्ये विकेट्स कश्या मिळतील आणि विरोधी संघाला आम्ही कसे रोखू शकतो. या सामन्यात आमचे मधल्या फळीतील फलंदाज अपयशी ठरले. सामन्याच्या पहिल्या २०-२५ षटकांमध्ये आम्ही बरोबरीवर होतो. मला विश्वास होता की, आम्ही लक्ष्य सहजपणे गाठू. पण, दक्षिण अफ्रिका संघाने खरोखर अप्रतिम गोलंदाजी केली आणि महत्वाच्या विकेट्स मिळवल्या.”
“मी २० व्या षटकानंतर फलंदाजी केली नाही, त्यामुळे मला माहीत नाही की खेळ कसा पालटला. याविषयी विराट आणि शिखरने सांगितले की, खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल आहे. फलंदाजांना फक्त खेळपट्टीवर वेळ घालवण्याची आवश्यकता होती. दुर्दैवाने आम्ही भागीदारी करू शकलो नाहीत. अफ्रिकी गोलंदाजांनी चांगले प्रदर्शन केले. आम्ही जास्त विकेट्स घेऊ शकलो नाहीत. धावफलकावर २० धावा अतिरिक्त होत्या, परंतु आम्हाला भागीदारीची गरज होती.” असे राहुलने पुढे बोलताना सांगितले.
केएल राहुल पुढे बोलताना असेही म्हटला की, आमच्यासाठी सगळेच सामने महत्वाचे आहेत आणि आम्ही आमचे सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करू इच्छितो. मागच्या काही काळापासून आम्ही एकदिवसीय क्रिकेट खेळलो नाहीत आणि यावेळी विश्वचषकाचा विचार करत आहोत. यासाठी सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन बनवायची आहे. आम्ही चुका करू पण त्यातून शिकू देखील.
दरम्यान, सामन्यात दक्षिण अफ्रिकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण अफ्रिका संघाने चार विकेट्सच्या नुकसानावर २९६ धावा केल्या. त्यानंतर प्रत्युत्तरात भारतीय संघाने ८ विकेट्सच्या नुकसानावर २६५ धावा केल्या. भारतासाठी विराट कोहली (५१) आणि शिखर धवन (७९) यांनी महत्वाची खेळी केली. तर दक्षिण अफ्रिकेसाठी टेंबा बावुमा (११०) आणि रासी वॅन डर ड्यूसेन (१२९) यांनी शतके ठोकली.
महत्वाच्या बातम्या –
‘कर्णधार असो वा नसो…’, केवळ खेळाडू म्हणून मैदानात उतरलेल्या विराटसाठी भावा-बहिणीची भावुक पोस्ट
Video: ‘तुला गर्लफ्रेंड आहे का?’, कपिल शर्माच्या प्रश्नावर पृथ्वी शॉने दिले ‘हे’ उत्तर
व्हिडिओ पाहा –