भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात सध्या तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका (sa vs ind odi series) खेळली जात आहे. कसोटी मलिकेत मिळालेल्या पराभवानंतर भारतीय संघ एकदिवसीय मालिकेत विजय मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. परंतु भारतीय संघातील खेळाडूंमध्ये अलिकडच्या काळात ताळमेळ दिसत नाहीय. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात देखील असेच काहीसे पाहायला मिळाले.
प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने पहिल्या दोन विकेट अवघ्या ६४ धावांवर गमावल्या होत्या. विराट कोहली शून्य धावांवर बाद झाल्यानंतर यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (rishabh pant) फलंदाजीसाठी खेळपट्टीवर आला. कर्णधार केएल राहुल (kl rahul) त्यावेळी खेळपट्टीवर स्थिरावण्याच्या मार्गावर होता. रिषभ पंतने केलेल्या एका चुकीमुळे राहुलला स्वस्तात विकेट गमवाली लागू शकत होती. परंतु सुदैवाने तो बचावला.
भारताच्या डावातील १५ व्या षटकात हा प्रकार घडला. दक्षिण अफ्रिकेचा फिरकी गोलंदाज केशव महाराज (keshav maharaj) यावेळी गोलंदाजीसाठी आला होता. केएल राहुल आणि पंतने या षटकातील सुरावातीच्या पाच चेंडूत पाच धावा घेतल्या. शेवटच्या चेंडूवर मात्र फलंदाजांमध्ये ताळमेळ दिसला नाही. शेवटच्या चेंडू पंतने ऑफ साइडच्या दिशेने खेळला. सुरुवातील पंत धाव घेण्यासाठी दोन पाऊल पुढे आला, पण इतक्यात त्याचा निर्णय बदलला आणि तो माघारी फिरला. परंतु नॉन स्ट्राइकवरील राहुल मात्र तोपर्यंत खेळपट्टीच्या अर्ध्यापर्यंत येऊन पोहोचला होता.
https://twitter.com/iAnmolFarya/status/1484462438816927744?s=20
पंत माघारी फिरल्यानंतर राहुलकडे माघारी जाऊन स्वतःची विकेट वाचवण्याची कसलीच आशा उरली नव्हती. पण दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावूमाने राहुलला धावबाद करण्यासाठी महाराजच्या दिशेने चेंडू फेकला आणि त्याला हा चेंडू पकडता आला नाही. महाराजच्या हातातून चेंडू सुटल्यामुळे राहुलला जीवनदान मिळाले आणि तो पुन्हा नॉन स्ट्राइकला येऊन पोहोचला. महाराजच्या हातातून चेंडू सुटून तो वेगवान गोलंदाज लुन्गी एन्गिडीच्या हातात गेला. अशात एन्गिडीने तो व्यवस्थित पकडून गोलंदाजाकडे फेकण्याची अपेक्षा होता, पण त्यालाही चेंडू नीट पकडता आला नाही. राहुलने या जीवनदानानंतर पुढे ७१ चेंडूत स्वतःचे अर्धशतक पूर्ण केले.
दरम्यान, भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन १२ व्या षटकात २९ धावा करून दक्षिण अफ्रिकेच्या ऐडन मार्करमच्या चेंडूचा शिकार झाला. तसेच तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या विराट कोहलीला एकही धाव करता आली नाही. धवनपाठोपाठ विराटदेखील १३ व्या षटकात केशव महाराजच्या चेंडूवर शून्य धावा करून तंबूत परतला.
महत्वाच्या बातम्या –
रिषभ पंत, केएल राहुल यावर्षी होणार मालामाल? बीसीसीआयच्या वार्षिक करारात होऊ शकतो ‘हा’ फायदा
विश्वास बसणार नाही; टीम इंडियात पडलेत दोन गट? ‘विराट आणि राहुल जवळही बसत नाही’
धक्कादायक! बिहार पोलिसांनी सचिनचा चाहता ‘सुधीर कुमार’ला चोपलं, वाचा सविस्तर
व्हिडिओ पाहा –