---Advertisement---

“…आता तरी ऋतुराजला संधी द्या”

ruturaj-gaekwad
---Advertisement---

दक्षिण अफ्रिका आणि भारत (sa vs ind odi series) यांच्यात सध्या तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिला सामना बुधवारी दक्षिण अफ्रिकेने ३१ धावांनी जिंकला आणि १-० अशी आघाडी घेतली. भारताला पहिल्या सामन्यात पराभव मिळाल्यानंतर अनेकांनी भारतीय संघ आणि खेळाडूंवर निशाणा साधला. आता या यादीत पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बट (salman butt) देखील सामील झाला आहे. त्याने कर्णधार केएल राहुल (kl rahul) आणि यष्टीरक्षक रिषभ पंत (rishabh pant) यांच्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

रोहित शर्मा दुखापतीमुळे दक्षिण अफ्रिका दौऱ्यात सहभागी होऊ शकला नाही आणि एकदिवसीय संघाची कमान केएल राहुलच्या हातात आली. परंतु केएल राहुलच्या नेतृत्वात भारतीय संघ पराभूत झाल्यामुळे त्याच्यावर चाहते टीका करत आहेत. पाकिस्तानचा दिग्गज सलमान बटच्या मते, यष्टीरक्षक रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर केले पाहिजे. तर राहुलने त्याच्या जागी यष्टीरक्षण करायला हवे. तसेच, रिषभ पंतच्या जागी इशान किशन किंवा ऋतुराज गायकवाड यांच्यापैकी एकाला संधी मिळाली पाहिजे. पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा मध्यक्रम पूर्णपणे अपयशी ठरल्यामुळे बटने हा सल्ला दिला आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---