---Advertisement---

“आता दीपक चहरला अधिक संधी देण्याची वेळ आलीये”

On: शनिवार, जानेवारी 22, 2022 9:03 PM
deepal-chahar
---Advertisement---

दक्षिण अफ्रिका दौऱ्यात (india tour of south africa) भारतीय संघाचे प्रदर्शन खूपच निराशाजनक राहिले. कसोटी मालिकेतील पराभवानंतर शुक्रवारी भारतीय संघाच्या हातातून एकदिवसीय मालिका देखील निसटली. एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी खेळला गेला, ज्यामध्ये दक्षिण अफ्रिकेने ७ विकेट्स राखून विजय मिळवला. भारतीय संघाचे गोलंदाजी आक्रमण या सामन्यात पूर्णपणे अपयशी ठरले. याच पार्श्वभूमीवर माजी दिग्गज कर्णधार सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांची मोठी प्रतिक्रिया आली आहे. गावसकरांनी अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारवर (Bhuvaneshear Kumar) निशाणा साधला, ज्याने दुसऱ्या सामन्यात एकही विकेट घेतली नाही.

भुवनेश्वर कुमार एकदिवसीय मालिकेती पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये खराब फॉर्ममध्ये दिसला. त्याने पहिल्या सामन्यात ६४ आणि दुसऱ्या सामन्यात ६७ धावा खर्च केल्या. या दोन्ही सामन्यात त्याला एकही विकेट घेता आली नाही. भुवनेश्वरचे प्रदर्शन पाहून गावसकरांना वाटते की त्याच्या जागी दीपक चहर (deepak chahar) याला संघात संधी दिली पाहिजे.

एका क्रीडा वृत्तसंस्थेशी बोलताना गावसकरांनी सांगितले की, भुवनेश्वर आणि दीपक एकाच प्रकारचे गोलंदाज आहे, त्यामुळे दीपकला संधी देण्याची वेळ आली आहे. ते म्हणाले की, “मला वाटते की दीपक चहरची वेळ आली आहे. तो युवा आहे, जवळपास त्याच प्रकारचा गोलंदाज आहे आणि खालच्या फळीत चांगली फलंदाजी करतो.”

फ्रेंचायझी क्रिकेटमध्ये देखील महाग ठरला भुवनेश्वर 

“भुवनेश्वर भारतीय क्रिकेटमधील एक जबरदस्त खेळाडू आहे. पण मागच्या एक वर्षात तो फ्रेंचायझी टी२० क्रिकेटमध्ये देखील महाग ठरला आहे. तो अप्रतिम यॉर्कर आणि संथगतीने गोलंदाजाची करायचा. पण, आता तो तसे करण्यात यशस्वी ठरत नाही. असे असू शकते की, विरोधकांना त्याची गोलंदाजी समजली असेल आणि त्यांना कळाले असेल की, त्याच्याविरुद्ध तयारी कशी करायची आहे. त्यामुळे शक्यतो आता दुसऱ्या कोणालातरी शोधण्याची गरज आहे,” असे गावसकरांनी पुढे बालताना सांगितले.

२०२३ विश्वचषकाच्या दृष्टीने संघ बनवण्याची गरज

गावसकरांच्या मते, २०२३ विश्वचषकासाठी संघाला आतापासूनच तयारीला सुरुवात करावी लागेल आणि युवा खेळाडूंना संधी द्यावी लागेल. ते पुढे म्हणाले की, “आता २०२३ विश्वचषकासाठी तुमचा मुख्य संघ कोणता असेल, हे पाहावे लागणार आहे. आपल्याला हे ठरवण्यासाठी १७-१८ महिन्यांचा चांगला वेळ मिळाला आहे. मुख्य संघाला जास्तीत जास्त एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. वेस्ट इंडीज, श्रीलंका आणि नंतर इंग्लंडविरुद्ध सामने येत आहेत. हीच ती वेळ आहे जेथे तुम्ही युवा खेळाडूंना जास्तीत जास्त सामन्यात खेळवण्याची संधी आहे, जेणेकरून ते विश्वचषकासाठी चांगल्या प्रकारे तयार होतील.”

महत्वाच्या बातम्या –

मुंबई-पुणे भूषवणार आयपीएल २०२२ चे यजमानपद? ‘या’ दिवशी होऊ शकतो शुभारंभ

दक्षिण आफ्रिकेत विजय मिळवणे भारतासाठी दुर्मिळच! आत्तापर्यंत गमावल्यात ‘एवढ्या’ वनडे मालिका

ना गोलंदाजीत, ना फलंदाजीत कमाल! द. आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या वनडेत भारताच्या पराभवाची ४ मुख्य कारणे

व्हिडिओ पाहा –

अतिशय महान खेळाडू जेव्हा स्वार्थापोटी आपली महानता विसरले | Sachin | Dravid |  Kallis |

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---