---Advertisement---

‘शमीला मिस केले जाईल, पण दोन युवा गोलंदाजांकडे मोठी संधी…’, माजी दिग्गजाचे INDvsSA कसोटीपूर्वी मोठे भाष्य

Mukesh-Kumar
---Advertisement---

Wasim Jaffer Statement: बॉक्सिंग डे म्हणजेच 26 डिसेंबरपासून भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात करणार आहे. या मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्क मैदानावर रंगणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाने कंबर कसली आहे. मात्र, या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी भारतीय संघाचा माजी दिग्गज फलंदाज वसीम जाफर याने मोठे विधान केले आहे.

वसीम जाफर (Wasim Jaffer) याने मालिकेत मोहम्मद शमी (Mohammed Shami) याच्या अनुपस्थितीत मुकेश कुमार (Mukesh Kumar) आणि प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna) यांना स्वत:ला सिद्ध करण्याची चांगली संधी असेल, असे म्हटले आहे.

वसीम जाफरचे ट्वीट
वसीम जाफर (Wasim Jaffer) याने त्याच्या अधिकृत एक्स (पूर्वीचे ट्विटर) हँडलवरून ट्वीट करत या दोन युवा वेगवान गोलंदाजांसाठी खास विधान केले. त्याने लिहिले की, “दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात मोहम्मद शमीला मिस केले जाईल, पण ही मुकेश कुमार आणि प्रसिद्ध कृष्णासाठी स्वत:ला भारतीय वेगवान गोलंदाजीचे भविष्य म्हणून सिद्ध करण्यासाठी मोठी आणि शानदार संधी आहे. ते गोलंदाजीसाठी दक्षिण आफ्रिकेपेक्षा चांगली जागा मागू शकत नाहीत. तुम्ही या दोघांपैकी तिसऱ्या गोलंदाजांच्या रूपात कुणाची निवड कराल?”

मात्र, अद्याप हे निश्चित नाहीये की, भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात प्रसिद्ध किंवा मुकेशपैकी कुणाची निवड करणार आहे. मात्र, ज्या कुणाला संधी मिळेल, तो या सामन्यात स्वत:ला सिद्ध करण्याच्या इराद्याने उतरेल. दोन्ही युवा वेगवान गोलंदाज प्रतिभावान आहेत. अलीकडेच दोघांनीही भारतासाठी कमालीचे प्रदर्शनही केले आहे.

खरं तर, भारतीय संघाचा दिग्गज वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी घोट्याच्या दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर पडला आहे. तो या मालिकेपूर्वी आपल्या दुखापतीतून पूर्णपणे बरा होऊ शकला नव्हता. शमीचे बाहेर होणे भारतासाठी मोठा धक्का आहे, पण युवा वेगवान गोलंदाजांना स्वत:ला सिद्ध करण्यासाठी ही शानदार संधीही आहे. (sa vs ind opportunity for mukesh kumar and prasidh krishna to shine in mohammad shami s absence says this cricketer)

हेही वाचा-
‘मला एका डोळ्याने कमी दिसत होतं…’, शाकिबने सांगितले वर्ल्डकपमधील खराब प्रदर्शनामागील धक्कादायक कारण
ब्रेकिंग! अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने ‘या’ 3 खेळाडूंवर घातली बंदी, देशाऐवजी पाहत होते स्वत:चं हित

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---