कोणत्याही क्रिकेटपटूला त्याच्या क्रिकेट कारकिर्दीदरम्यान अनेकदा चढ-उतारांना सामोरे जावे लागते. एखादा क्रिकेटपटू बराच काळ खराब फॉर्ममधून जात असल्यास, त्याला प्रचंड टिकेचा सामना करावा लागतो. बऱ्याचदा त्याच्या संघातील स्थानावरही प्रश्नचिन्ह उभा राहातो. असेच काहीचे सध्या घडते आहे, भारताचा अनुभवी कसोटीपटू अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याच्यासोबत.
गेल्या वर्षभरापासून तो खराब फॉर्मचा सामना करतो आहे. सातत्याने संधी मिळूनही त्याला सूर गवसताना दिसत नाहीये. त्यामुळे भारतीय संघाच्या आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी (India Tour Of South Africa) संघ व्यवस्थापनाने त्याच्याकडून कसोटी संघाचे उपकर्णधारपदही (Test Team Vice Captaincy) काढून घेतले आहे. मात्र त्याला फलंदाज म्हणून संघात जागा दिली गेली आहे. अशात या दौऱ्यावर स्वत:ला सिद्ध करत संघातील आपले स्थान वाचवण्यासाठी त्याने कंबर कसली आहे. रहाणेने आपली लय परत मिळवण्यासाठी नवा गुरू शोधला असून त्याचे गुरू अजून कोणी नसून ते भारताचे माजी दिग्गज विनोद कांबळी आहेत.
२६ डिसेंबर २०२१ ते १५ जानेवारी २०२२ दरम्यान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताला ३ सामन्यांची कसोटी मालिका (3 Matches Test Series) खेळायची आहे. या मालिकेसाठी १६ डिसेंबर रोजी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला उड्डाण भरणार आहे. तत्पूर्वी रहाणे कांबळी (Vinod Kambli) यांच्याकडून फलंदाजीचे धडे घेण्यासाठी गेला आहे. कांबळी यांच्या देखरेखीखाली त्याने फलंदाजीचा सरावही केला आहे. रहाणेसोबत भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) यानेही कांबळींच्या मार्गदर्शनाखाली सराव केला आहे.
स्वत: कांबळी यांनी रहाणे आणि पंतचे फोटो शेअर करत सर्वांना याबद्दलची माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या ट्वीटर अकाउंटवर त्यांचे फोटो शेअर केले आहेत. यावर कॅप्शनमध्ये कांबळींनी लिहिले आहे की, “दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी रहाणे आणि पंतची मदत करून खूप चांगले वाटले. सरावादरम्यान आमच्यात दक्षिण आफ्रिकेतील परिस्थितीसंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा झाल्या. तुम्हा दोघांनाही या दौऱ्यासाठी शुभेच्छा.”
Was a pleasure to help Ajinkya & Rishabh train for the upcoming South Africa series. Shared some valuable insights with them about the SA conditions. My best wishes to them for #SAvIND series.
P.S. Christiano got some lessons as well 😄 pic.twitter.com/bi0aRuyJHj— Vinod Kambli (@vinodkambli349) December 13, 2021
विनोद कांबळी यांची कसोटी कारकिर्द फार छोटी राहिली होती. परंतु आपल्या २ वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत १७ सामने खेळताना त्यांनी ५४ च्या सरासरीने १०८४ धावा कुटल्या होत्या. यादरम्यान त्यांच्या बॅटमधून ४ शतके आणि ३ अर्धशतके निघाली होती. सोबतच त्यांची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्याही २२५ धावा इतकी राहिली होती.
त्यामुळे अशा दिग्गजाकडून फलंदाजीचे मंत्र घेतल्यानंतर आता रहाणे आणि पंत दक्षिण आफ्रिकेत कसे प्रदर्शन करतात? हे पाहावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या-
रोहित शर्मा कसोटी मालिकेतून बाहेर! आता उपकर्णधारपदासाठी ‘हे’ आहेत ३ पर्याय