---Advertisement---

स्मृती मानधनानं रचला इतिहास! 84 सामन्यांतच 7 शतके झळकावून केली मिताली राजची बरोबरी

---Advertisement---

स्टार सलामीवीर स्मृती मानधना सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. मानधनाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात सलग दुसरे शतक झळकावले आहे. तिने आपल्या वनडे कारकिर्दीतील सातवे शतक पूर्ण केले. या शतकानंतर मानधनाने माजी कर्णधार मिताली राजच्या विक्रमाची बरोबरी केली. दक्षिण आफ्रिकेचा महिला क्रिकेट संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. स्मृतीने मालिकेतील पहिल्या वनडे सामन्यातही धमाकेदार शतक झळकावले होते.

स्मृती मानधनाने भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील बंगळुरु येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 103 चेंडूत तिच्या एकदिवसीय कारकिर्दीतील सातवे शतक पूर्ण केले. स्मृतीचे 84 एकदिवसीय सामन्यातील हे 7 वे शतक आहे. यादरम्यान तिने मिताली राजच्या 7 वनडे शतकांची बरोबरी केली. भारताकडून वनडेमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याचा विक्रम मिताली राजच्या नावावर होता. आता स्मृती मानधनाला मालिकेतील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात मितालीला मागे सोडण्याची संधी असेल. यासह  तिने बॅक टू बॅक सामन्यात शतक ठोकणारी ती पहिली भारतीय महिला क्रिकेटर ठरली आहे.

स्मृती अनस्टॅापेबल मानधना

वनडेमध्ये बॅक टू बॅक शतके झळकावणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटर.
महिला एकदिवसीय सामन्यामध्ये एका भारतीयाने केलेल्या सर्वाधिक शतकांची बरोबरी.
स्मृतीने तिच्या एकदिवसीय कारकिर्दीतील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या (136) केली .  

मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टाॅस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघ प्रथम फलंदाजी करत स्मृती मानधना आणि कर्णधार हरमनप्रीत काैरच्या शतकी खेळीच्या जोरावर 326 धावांचे तगडे आव्हान दक्षिण आफ्रिकेसमोर ठेवले आहे.

महत्तवाच्या बातम्या-

स्मृती मानधना, हरमनप्रीत कौरची शानदार शतकी खेळी, दक्षिण आफ्रिकेसमोर 326 धावांचं आव्हान
आजपासून सुपर-8 चा थरार, पहिल्याच सामन्यात दक्षिण अफ्रिकेसमोर अमेरिकेचे तगडे अव्हान!
विराट कोहलीच्या फाॅर्मबद्दल भारताच्या माजी खेळाडूचं वक्तव्य! दिलं रोहितचं उदाहरण

 

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---