दक्षिण अफ्रिकेविरुद्धचा पहिला कसोटी सामना (south africa vs india) २६ डिसंबरपासून सुरू झाला. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाने चांगले प्रदर्शन केले. तर दुसरीकडे दक्षिण अफ्रिकेसाठी त्यांचा वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडी (Lungi Ngidi) याने पहिल्या दिवशी सर्वोत्तम प्रदर्शन केले. भारतीय संघ जरी भक्कम स्थितीत असला, तरी दक्षिण अफ्रिका सामन्यात पुनरागमन करू शकतो असा विश्वास एन्गिडीने व्यक्त केला.
पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर एन्गिडी म्हणाला की, “हे कसोटी क्रिकेट आहे. तुम्ही काही सत्र जिंकता, तर काही सत्र हरता. एकंदरित पाहता हा क्रिकेटचा चांगला दिवस होता. त्या खेळपट्टीवर अजून खूप काही आहे. गोष्टी लवकर बदलतात. जर तुम्ही दोन चेंडूत दोन विकेट्स मिळवू शकता, तर याचा अर्थ असा आहे की, काहीही होऊ शकते. जर आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी-सकाळी काही यश मिळवले, तर सामन्यात वर्चस्व तयार करू शकतो.”
सामन्याच्या पहिल्या दिवशी दक्षिण अफ्रिकेच्या गोलंदाजांना अपेक्षित स्विंग मिळत नसल्याचे पाहायला मिळाले. याबाबतीत तो पुढे बोलताना म्हणाला की, “गोलंदाज खेळपट्टीमुळे थोडे निराश होते. कारण, त्यावर स्विंगची थोडी कमतरता होती. आम्ही जसा विचार केला होता, खेळपट्टीवर तसे प्रदर्शन दिसले नाही. तसेच भारतीय फलंदाजांनी चांगला संयम दाखवली. मला थोड्या अधिक स्विंगची अपेक्षा होती आणि जेव्हा असे झाले नाही, तेव्हा आम्हाला आमच्या रणनीतीत बदल करावा लागला.”
दरम्यान, उभय संघांतील कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाचा विचार केला, तर भारताने पहिल्या दिवशी तीन विकेट्स गमावल्या. दक्षिण अफ्रिका संघाला मिळालेले हे तिन्ही विकेट्स एकट्या लुंगी एन्गिडीने घेतले होते. भारताचा कर्णधार विराट कोहलीसह चेतेश्वर पुजार आणि सलामीवीर मयंक अगरवाल यांना एन्गिडीने तंबूत पाठवले. डावाच्या ४१ व्या षटकात एन्गिडीने मयंक अगरवाल आणि चेतेश्वर पुजारा यांना लागोपाठ चंडूवर बाद केले. भारताने पहिल्या दिवशी ९० षटकांचा सामना केला आणि २७२ धावा केल्या. केएल राहुल (१२२) आणि अजिंक्य रहाणे (४०) खेळपट्टीवर कायम आहेत. दुसऱ्या दिवशी पावसामुळे एकाही चेंडूचा खेळ होऊ शकला नाही.
महत्वाच्या बातम्या –
इंग्लंडचे सलामीवीर २०२१ वर्षात सुपरफ्लॉप! नको असलेल्या विक्रमाच्या यादीत गाठले अव्वल स्थान
Video: पप्पा हार्दिकला सोबतीला घेत अगस्त्यची जबरदस्त फलंदाजी, काका कृणालनेही गोलंदाजी करत दिली साथ
‘धोनीने जेव्हा कसोटीतून निवृत्ती घेतली, तेव्हा खेळाडूंना बसलेला धक्का’, माजी प्रशिक्षकाचा खुलासा
व्हिडिओ पाहा –