दक्षिण अफ्रिका आणि भारत (sa vs ind test series) यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा सामना केपटाऊनमध्ये खेळला जाणार आहे. हा सामना ११ जानेवारीपासून सुरू होईल. उभय संघातील दुसरा कसोटी सामना जोहान्सबर्गच्या वॉन्डरर्स स्टेडियमवर झाला आणि भारताला सात विकेट्सने पराभव पत्करावा लागला. कर्णधार विराट कोहली (virat kohli) दुसऱ्या कसोटीत उपस्थित नसल्यामुळे संघाला नक्कीच नुकसान झाले असावे. परंतु, तिसऱ्या कसोटीत विराट भारतीय संघाला विजय मिळवून देण्याची शक्यता आहे.
उभय संघातील पहिला सामना भारताने विराट कोहलीच्या नेतृत्वात जिंकला होता. त्यानंतर जोहान्सबर्गमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात विराट दुखापतीमुळे उपस्थित नव्हता. आता तिसऱ्या कसोटीत विराट कोहली पुनरागमन करण्याची दाट शक्यता आहे. याविषयी अद्याप अधिकृतपणे कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. मात्र, प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी दिलेल्या माहितीवरून विराट संघात पुनरागमन करेल, असे वाटते. द्रविड म्हणाले की, विराट नेट्समध्ये सराव करत आहे आणि पहिल्यापेक्षा खूप चांगला दिसत आहे.
विराटने तिसऱ्या सामन्यात पुनरागमन केले, तर तो संघासाठी विजयाचा फॉर्मुला देखील घेऊन येईल. विराटने आतापर्यंत या फॉर्मुल्यासोबत २७ कसोटी सामने खेळले आहेत आणि त्यापैकी एकामध्येही संघाला पराभव मिळाला नाही. जर त्याने हा फॉर्मुला केपटाऊन कसोटीत वापरला, तर मालिकेतील विजय पक्का असेल. हा फॉर्मुला आहे, दक्षिण अफ्रिकेपुढे शेवटच्या डावात १५० पेक्षा अधिक धावांचे लक्ष्य ठेवणे. विराटने संघाचे नेतृत्व करताना आतापर्यंत २७ कसोटी सामन्यांमध्ये विरोधी संघासमोर हे लक्ष्य ठेवले आणि त्यापैकी २५ सामने भारताने जिंकले. तर, राहिलेले दोन सामने अनिर्णीत राहिले.
दरम्यान, केपटाऊनमधील भारतीय संघाचा इतिहास पाहिला, तर तो खराब आहे. भारतीय संघाने या मैदानावर आतापर्यंत पाच कसोटी सामने खेळले आहेत. या पाच पैकी तीन कसोटी सामन्यांत संघाला पराभव मिळाला आहे, तर दोन सामने अनिर्णीत राहिले आहेत. अशात भारतीय संघाने तिसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवल्यानंतर केपटाऊनमधील हा संघाचा पहिला विजय असेल. तसेच, दक्षिण अफ्रिकेत पहिल्यांदाच भारतीय संघ कसोटी मालिका जिंकेल. केपटाऊन कसोटीसाठी मैदानात उतरताना विराट त्याचा विजयी फॉर्मुला डोक्यात ठेऊन येईल, यात शंका नाही.
महत्वाच्या बातम्या –
पहिल्याच परिक्षेत ‘कर्णधार’ केएल राहुल फेल, जोहान्सबर्ग कसोटीत केल्या ‘या’ मोठ्या चूका
अजबच! चेंडू स्टम्पला लागला, अंपायरनेही आऊट दिले होते, तरीही स्टोक्सला मिळाले ‘असे’ जीवदान
मँचेस्टर युनायटेडमध्ये खळबळ! एकाच वेळी तब्बल १७ प्रमुख खेळाडू संघ सोडण्याच्या तयारीत
व्हिडिओ पाहा –