चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जवळ येत असताना पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तिरंगी मालिकेत दक्षिण आफ्रिकेच्या मॅथ्यू ब्रीट्झकेने ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला. आपल्या पहिल्याच एकदिवसीय सामन्यात त्याने 150 धावा करत जागतिक क्रिकेटमध्ये मोठी छाप सोडली. पदार्पणातच एवढ्या मोठ्या धावसंख्येचा विक्रम याआधी कोणत्याही फलंदाजाने केला नव्हता.
दक्षिण आफ्रिकेसाठी पदार्पणात शतक झळकावणाऱ्या खेळाडूंमध्ये ब्रीट्झके चौथा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी कॉलिन इंग्रम (124), टेम्बा बावुमा (113) आणि रीझा हेंड्रिक्स (102) यांनी हे यश मिळवले होते. मात्र, 150 धावांची शानदार खेळी करत मॅथ्यू ब्रीट्झकेने या सर्वांना मागे टाकले.
विशेष म्हणजे, ब्रीट्झकेने वेस्ट इंडिजच्या महान फलंदाज डेसमंड हेन्सचा 47 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला आहे. 1978 मध्ये हेन्सने पदार्पणात 148 धावा केल्या होत्या, मात्र ब्रीट्झकेने त्याला मागे टाकत एक नवा इतिहास रचला आहे. त्याने 148 चेंडूत 11 चौकार आणि 5 षटकारांसह आपल्या सामन्यावर वर्चस्व गाजवले. हा विक्रम क्रिकेट विश्वासाठी एक ऐतिहासिक क्षण असून ब्रीट्झकेने आपल्या कारकिर्दीची शानदार सुरुवात केली आहे.
MATTHEW BREETZKE, TAKE A BOW ????
– 150 runs from 148 balls on his ODI Debut against Matt Henry & co at Lahore…!!!!
Waiting for Breetzke in LSG jersey in IPL 2025. pic.twitter.com/pCkF79WLky
— Johns. (@CricCrazyJohns) February 10, 2025
सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, या तिरंगी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड आमने-सामने आहेत. या सामन्यात न्यूझीलंडने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या डावात खेळताना आफ्रिकेने मर्यादित 50 षटकात 6 गडी गमावून 304 धावा केल्या. ज्यामध्ये मॅथ्यू ब्रीट्झकेने शानदार शतकी खेळी खेळली. या शिवाय विआन मुल्डरने 61 धावा केल्या. गोलंजीत न्यूझीलंडकडून विल्यम ओरोर्के आणि मॅट हेन्री यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. या बातमीखेरीस न्यूझीलंड लक्ष्याचा पाठलाग करताना 10 षटकांत 50-1 अश्या स्थितीत आहे.
हेही वाचा-
‘सामन्याच्या जोशात जीवनाची किंमत’, अहमदाबाद वनडेत BCCI राबवणार अनोखा उपक्रम
हिटमॅनची आणखी एक झेप! डिव्हिलियर्सला मागे टाकले, धोनी-पॉन्टिंगला गाठणार?
अहमदाबादमध्ये विक्रम! रोहित मालिकेतील शेवटच्या सामन्यात 11,000 धावांचा टप्पा गाठणार?






