क्रिकेट विश्वचषक सुरू झाल्यापासून दक्षिण आफ्रिका संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. बुधवारी (1 नोव्हेंबर) दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड या दोन बलाढ्य संघांमध्ये आमना सामना खेळला गेला. पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. रासी वॅन डर ड्यूसेन याने 101 चेंडूत स्वतःचे शतक पूर्ण केले आणि संघाची धावसंख्या उंचावण्यासाठी महत्वाचे योगदान देऊ शकला.
दक्षिण आफ्रिका संघाचा सलामीवीर फलंदाज क्विंटन डी कॉक याने बुधवारच्या सामन्यात पहिले शतक ठोकले. डी कॉक याने 116 चेंडूत 114 धावांची खेळी करून विकेट गमावली. पण दुसऱ्या बाजूला रासी वॅन डर ड्यूसेन खेळपट्टीवर टिकून राहिला. डी कॉक बाद झाल्यानंतर काहीच चेंडूंमध्ये ड्यूसेनने शतक पूर्ण केले. शतकी खेळीदरम्यान ड्यूसेनच्या बॅटमधून 8 चौकार आणि 2 षटकार निघाले. चालू विश्वचषक हंगामातील ड्यूसेनचे हे दुसरे शतक ठरले.
दरम्यान, सलामीवीर डी कॉक आणि तिसऱ्या क्रमांकावर खेळमाऱ्या रासी वॅन डर ड्यूसेन यांच्यात द्विशतकी भागीदारी देखील झाली. दोघांनी खेळपट्टीवर एकत्र 189 चेंडू खेळले आणि बरोबर 200 धावा पूर्ण झाल्यानंतर ही जोडी तुटली. उभय संघांतील या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज त्यांच्यावर भारी पडल्याचे पाहायाला मिळाले. (SA vs NZ । Yet another hundred for Rassie van der Dussen World Cup 2023)
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन –
न्यूझीलंड – डेवॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिचेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक/कर्णधार), ग्लेन फिलिप्स, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, टीम साऊदी, ट्रेंट बोल्ट.
दक्षिण आफ्रिका – क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), टेम्बा बावुमा (कर्णधार), रासी व्हॅन डर ड्युसेन, एडेन मार्करम, हेन्रीच क्लासेन, डेविड मिलर, मार्को यान्सेन, जेराल्ड कोएट्झी, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एन्गिडी.
महत्वाच्या बातम्या –
मोठी बातमी! ऑस्ट्रेलियाचं टेंशन वाढलं, अष्टपैलू मॅक्सवेलची मस्ती संघाला पडणार महागात
कहर! डी कॉकने वर्ल्डकपमध्ये घडवला इतिहास, दक्षिण आफ्रिकेच्या कुठल्याच फलंदाजाने केली नाही ‘अशी’ डेरिंग