दक्षिण आफ्रिकेच्या SA20 लीगमध्ये एमआय केपटाऊनने सनरायझर्स ईस्टर्न केपला अंतिम सामन्यात पराभूत करत पहिले विजेतेपद पटकावले. या सामन्यात एक खास गोष्ट होती. दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज डेव्हिड बेडिंगहॅम या आठवड्यात लग्न करणार होता पण त्याचा संघ, सनरायझर्स ईस्टर्न केप सलग तिसऱ्यांदा SA20 च्या अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर, त्याने त्याचे लग्न पुढे ढकलले आणि त्याच्या फ्रँचायझीसाठी खेळण्याचा निर्णय घेतला. सनरायझर्स टीम तिसऱ्या विजेतेपदाच्या शोधात होती आणि त्यामुळे बेडिंगहॅमने तिच्या लग्नाची तारीख बदलण्याचा निर्णय घेतला.
बेडिंगहॅम या आठवड्यात त्याची मंगेतर जेना व्हॅन निकर्कसोबत लग्न करणार होता, मात्र सनरायझर्स संघ सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचल्याने त्याने लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्याचा संघ विजेतेपद मिळवेल या आशेने तो मैदानात उतरला. शनिवारी (9 फेब्रुवारी) जोहान्सबर्ग येथे झालेल्या अंतिम सामन्यात सनरायझर्सला विजयासाठी 182 धावांचा पाठलाग करताना बेडिंगहॅम अवघ्या 5 धावा काढून माघारी परतला. सनरायझर्सचा डाव 105 धावांवरच गडगडला आणि एमआय केपटाऊनने 76 धावांनी विजय मिळवत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
बेडिंगहॅमने सामना खेळण्यासाठी लग्न लांबणीवर टाकलं, मात्र त्याच्या पत्नीला हा निर्णय फारसा पसंत नव्हता. तो म्हणाला, “काल माझी पत्नी म्हणाली की आपण पात्रता फेरीत हरावं म्हणजे लग्न वेळेवर होईल! पण आम्ही फायनलमध्ये पोहोचलो, त्यामुळे आता मी सामन्यानंतर लग्न करणार आहे.”
सनरायझर्सच्या पराभवानंतरही बेडिंगहॅमसाठी आनंदाची बातमी म्हणजे त्याचे लग्न आता लवकरच होणार आहे. 9 फेब्रुवारीला नियोजित असलेले लग्न पुढे ढकलून तो फायनलसाठी सज्ज झाला होता. पण आता तो मैदानावर नव्हे, तर विवाह मंडपात हजेरी लावणार आहे.
हेही वाचा-
कटकमध्ये शमीचा ‘विक्रमवेध’, स्टार्कला मागे टाकण्याची संधी!
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी न्यूझीलंडला मोठा धक्का! रचिन रवींद्र भर मैदानात रक्तबंबाळ
ताकद की कमकुवत बाजू? पुल शॉटमुळे रोहित शर्माची कसोटी सुरू!






