---Advertisement---

दिग्गजाने सांगितले आयपीएलमध्ये जास्त भारतीय प्रशिक्षक नसण्याचे कारण; म्हणाला…

On: सोमवार, डिसेंबर 20, 2021 9:00 PM
anil-kumble-pbks-coach
---Advertisement---

आयपीएल (IPL) मध्ये भारतातील अनेक युवा खेळाडूंना खेळण्याची आणि स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळते. परंतु, भारतीय प्रशिक्षकांना मात्र या लीगमध्ये जास्त संधी मिळालेल्या नाहीत. आयपीएलमधील जास्तीत जास्त फ्रेंचायझींच्या मुख्य प्रशिक्षकपदी विदेशी चेहरे पाहायला मिळतात. अशात भारताचे माजी यष्टीरक्षक फलंदाजा सबा करीम (saba karim) यांनी आयपीएलमध्ये भारतीय प्रशिक्षक नसण्याविषयी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी यावेळी संघमालक विदेशी प्रशिक्षकांना का पसंती देतात यामागचे कारण देखील सांगितले आहे.

करीम यांच्या मते जेव्हा कोणत्याही संघाचे मालक प्रशिक्षकाची नियुक्ती करतात, तेव्हा ते त्या प्रशिक्षकाकडे किती अनुभव आहे, याला महत्व देतात. याच कारणास्तव ज्या प्रशिक्षकांनी जगभरात फिरून संघांना विजय  मिळवून दिला आहे, त्यांना महत्व मिळते. त्यांच्या मते भारतीय खेळाडू विदेशातील लीगमध्ये खेळत नाहीत आणि याच कारणास्तव भारतीय प्रशिक्षक देखील जगासमोर येऊ शकले नाहीत.

करीम त्यांच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना म्हणाले की, “भारतीय खेळाडूंना विदेशी लीगमध्ये खेळण्याची संधी नसते. जर भारतीय खेळाडूंनी देखील विदेशी लीगमध्ये सहभाग घेतला, तर त्या संघाचे मालकही भारतीय प्रशिक्षकांना शोधतील. महिला खेळाडूंना विदेशी लीगमध्ये खेळण्याची संधी आहे आणि त्या चंगली प्रगती करत आहेत. जोपर्यंत विदेशी संघाच्या मालकांना भारतीय प्रशिक्षकांवर विश्वात बसत नाही, तोपर्यंत अशीच परिस्थिती राहिलं.”

“आपल्याकडे सध्या खूप सारे चांगले प्रशिक्षक आहेत, ज्यांच्याकडे खूप अनुभव आहे. काही प्रशिक्षक आयपीएमध्ये आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांच्या अंतर्गत काम करत आहेत. जर भारतीय संघ आज एवढा यशस्वी आहे, तर त्यामागे भारतीय प्रशिक्षकांचे खूप मोठे योगदान आहे,” असे ते पुढे बोलताना म्हणाले.

आयपीएलमधील सध्याच्या प्रशिक्षकांचा विचार केला, तर त्यामध्ये खूपच कमी भारतीय आहेत. भारताचे माजी दिग्गज खेळाडू अनिल कुंबळे पंजाब किंग्स फ्रेंचायझीचे प्रशिक्षक आहेत. तर, संजय बांगर आता रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे प्रशिक्षक बनले आहेत.

महत्वाच्या बातम्या –

वनडेत पाँटिंग, टी२०त धोनी अन् कसोटीत स्मिथ, क्रिकेटमधील ‘बड्या’ विक्रमात हे दिग्गज राहिलेत ‘नंबर १’

ईएमएमटीसी १४ वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत संप्रित शर्मा, अर्णव पापरकर, वेदांत भसीन यांचा विजय

राष्ट्रीय ज्युनियर रोईंग अजिंक्यपद स्पर्धा: बॉईज स्पोर्टसने राखले वर्चस्व, महिला गटात केरळ संघ प्रथम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---