---Advertisement---

‘बटलर सर्वोत्कृष्ट, तर पंत पेनपेक्षा चांगला यष्टीरक्षक’, माजी भारतीय क्रिकेटरचे ऑसी फिरकीपटूला प्रत्युत्तर

On: शनिवार, नोव्हेंबर 27, 2021 5:26 PM
---Advertisement---

क्रिकेट वर्तुळात ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार टीम पेन सध्या बराच चर्चेत आहे. २०१७ मध्ये केलेल्या चूकीमुळे त्याने कसोटी कर्णधारपद सोडले असून आता अनिश्चित काळासाठी क्रिकेटमधून विश्रांती घेतील आहे. अशात ऑस्ट्रेलियन फिरकी गोलंदाज नॅथन लायन म्हटले होते की, टीम पेन हा केवळ ऑस्ट्रेलियाचाच नाही, तर संपूर्ण जगातील सर्वोत्तम यष्टिरक्षक आहे. यावर माजी भारतीय क्रिकेटपटू सबा करीम यांनी नॅथन लायनच्या विधानावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

त्यांनी म्हटले आहे की, ते रिषभ पंतला टीम पेनपेक्षा चांगला यष्टिरक्षक मानतात. याशिवाय त्यांनी जगातील सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षकांची नावेही सांगितली आहे आणि त्यांनी या यादीत जॉस बटलरला सर्वात वरचे स्थान दिले आहे.

नॅथन लायनच्या वक्तव्यावर माजी क्रिकेटपटू सबा करीम यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. एका वाहिनीशी बोलताना ते म्हणाले, “मी नॅथन लायनच्या विधानाशी सहमत नाही. या बाबतीत जागतिक क्रिकेटमध्ये दोन-तीन खेळाडू स्पर्धेत आहेत. जॉस बटलर हा महान यष्टिरक्षक आहे आणि मोहम्मद रिझवानने पाकिस्तानसाठी चांगली कामगिरी केली आहे. मी माझ्या यादीत बटलरला आधी ठेवेन त्यानंतर रिझवानला ठेवीन. तसेच मी रिषभ पंतला टिम पेनच्या आधी स्थान देईन.”

यष्टीरक्षक टीम पेनने नुकताच ऑस्ट्रेलियाच्या कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला असून तो अनिश्चित काळासाठी विश्रांतीवर गेला आहे. सेक्सटिंग प्रकरण समोर आल्यानंतर टीम पेनने हा निर्णय घेतला आणि आता त्याच्या जागी पॅट कमिन्सची ऑस्ट्रेलिया कसोटी संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

याआधी नॅथन लायनने टीम पेनचा बचाव केला होता. पेनने आपली चूक मान्य केली होती आणि त्यासाठी खूप हिंमत लागते, असे तो म्हणाला होता. तो म्हणाला की माझ्या दृष्टीने टीम पेन हा ऑस्ट्रेलियाचा आणि संपूर्ण जगातील सर्वोत्तम यष्टीरक्षक आहे. त्याला ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा पूर्ण पाठिंबा आहे, असे मी खात्रीने सांगू शकतो. या वादामुळे त्यांचे लक्ष विचलित झाले असेल, असे मला वाटत नाही.

ऑस्ट्रेलियाला ८ डिसेंबरपासून मायदेशात इंग्लंडविरुद्ध ऍशेस मालिका खेळायची आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

कानपूरचे स्टेडियम का आहे श्रेयस अय्यरसाठी खास? पाहा दोन मुंबईकरांची मन जिंकणारी मुलाखत

“झहीरला पाहून कर्णधार होण्याची प्रेरणा मिळाली”; कमिन्सने केला खुलासा

पाच विकेट्स हॉल घेत फिरकीपटू अक्षरने केले ‘हे’ मोठे विक्रम, ठरला पहिला आणि एकमेव भारतीय 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---