बांगलादेशविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी रिंकू सिंग (Rinku Singh) याचा भारताच्या 15 सदस्यीय संघात समावेश करण्यात आला आहे. पुढील महिन्यात 6 ऑक्टोबरपासून बांगलादेशविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघाची शनिवारी घोषणा करण्यात आली. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली भारत ही मालिका खेळेल. या मालिकेसाठी रिंकू सिंग याला नव्या भूमिकेत पाहायला आवडेल, असे माजी क्रिकेटपटू सबा करीम (Saba Karim) यांनी म्हटले.
बांगलादेशविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी अभिषेक शर्मासोबत सलामीसाठी रिंकू सिंगची माजी निवडकर्ता सबा करीमने निवड केली आहे. रिंकू सिंग आणि अभिषेकची जोडी खूपच धोकादायक ठरेल, असा विश्वास करीम यांना वाटतो. खालच्या फळीत फलंदाजी केल्यामुळे रिंकूला फारसे चेंडू मिळत नाहीत. वरच्या क्रमांकावर संधी मिळाल्यास तो अधिक योगदान देऊ शकेल, असे सबा यांनी सांगितले.
सबा करीम म्हणाले, “आपण अभिषेक शर्मासोबत रिंकू सिंग याला सलामीवीर म्हणून पाहण्याची दाट शक्यता आहे. रिंकूला जे काही चान्स मिळाले आहेत, तो सहाव्या किंवा सातव्या क्रमांकावर मिळाले आहेत. त्याला खेळण्यासाठी मोजकेच चेंडू मिळतात. रिंकू एक परिपूर्ण खेळाडू आहे. त्याला अधिक संधी मिळाल्यास, खेळण्यासाठी अधिक चेंडू मिळाले तर तो संघासाठी अधिक योगदान देऊ शकतो. त्यामुळे ही जुळवाजुळव होण्याची दाट शक्यता आहे.”
रिंकू याने आतापर्यंतच्या आपल्या छोट्याशा कारकिर्दीत शानदार खेळ दाखवत सर्वांची मने जिंकली आहेत. आयपीएलचे सलग तीन हंगाम गाजवल्यानंतर त्याला भारतीय संघात संधी मिळाली होती. त्याने संघासाठी फिनिशर म्हणून आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
बांगलादेशविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघ: सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, रियान पराग, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, मयंक यादव.
महत्त्वाच्या बातम्या-
SL vs NZ; कोण आहे हा फिरकीपटू? पदार्पण सामन्यातच घेतल्या 9 विकेट्स
कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक वेळा 600+ धावा करणारे टाॅप-5 संघ
IPL 2025; “आरसीबी फक्त कोहलीलाच रिटेन करणार” माजी खेळाडूचे खळबळजनक वक्तव्य