संयुक्त अरब अमीरातीमधील शारजाच्या मैदानावर भारताचा तेव्हाचा उभारता सितारा खेळत होता जो पुढे जाऊन या खेळाचा देवता बनला. सचिनची ही एकदिवसीय क्रिकेटमधील चौदावे शतक होते पण हे शतक त्याच्या आता कोणत्याही क्रिकेटमधल्या खेळीपेक्षा खूप मोठे होते. टोनी ग्रेगच्या सामन्याच्या समालोचनाबे सचिनच्या अविस्मरणीय खेळीचे विश्लेषण करताना हे उद्गार काढले “काय विस्मयकारक खेळाडू.”
कोका कोला कपच्या अंतिम सामन्यात प्रवेश करण्यासाठी भारतपुढे त्या काळचा सर्वात हरवण्यास अवघड संघ आणि त्या कपमधला एकही सामना न हरणारा संघ होता तो म्हणजे ऑस्ट्रेलिया . 22 एप्रिल 1998 ला भारताचा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध शारजाच्या ऐतिहासिक मैदानावर होणार होता. ऑस्ट्रेलियासाठी हा सामना एका सराव सामन्यासारखा होता कारण त्याचा संघ आधीच अंतिम सामन्यासाठी पात्र झाला होता.
ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदजी करत मायकल बेव्हनच्या 101धावांच्या जोरावर 284धावांचा डोंगर भारतासमोर रचला होता. सचिन तेंडुलकरने त्या सामन्यात गोलंदाजी करताना 5 षटकात 25 धाव देत एक गडी बाद केला होता. सचिनसाठी हा सामना खूप महत्वाचा होता कारण त्याच्याकडून सर्व भारतीय क्रिकेट रसिकांची अपेक्षा होती . सचिन तेंडुलकर आणि सौरभ गंगुली हे भारताचे तेव्हाचे सलामीची फलंदाज धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरण्याच्या आधीच मैदानात वाळू वादळ आले आणि सामना काही काळ स्थगित करावा लागला होता. जेव्हा भारत पुन्हा धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला तेव्हा भारताला 46 षटकात 276 धावा करायच्या होत्या पण भारतासाठी लक्ष हे नसून अंतिम सामन्यासाठी पात्र होण्यासाठी 237 धावा करणे हे होत, ज्याने करून भारताचा त्या कपमधील रनरेट न्यूझीलंडपेक्षा चांगला होईल .
सचिनने तेव्हा आपला उत्तोमोत्तम खेळ केला आणि भारताला अंतिम सामन्यात जाण्यास पात्र ठरवले. या सामन्यात सचिन जेव्हा बाद झाला तेव्हा पंचानी त्याला बाद दिले नव्हते तरी सचिनने खेळाडू वृत्ती दाखवून पॅविलनमध्ये परतला, कदाचित यामुळेच भारताला हा सामना जिंकता आला नाही पण सचिनने जगाला आपल्या बॅटची जादू दाखून दिली होती. त्याकाळचा सर्वोत्तम फिरकी गोलंदाजानांपैकी एक असलेला शेन वॉर्नला ही सचिनने सुट्टी दिली नाही .
सचिनने त्या सामन्यात 197 मिनिटे फलंदाजी करत 131 चेंडूत 143 धावा केल्या, ज्यात 8 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. या सामन्यात सामनावीराचा मानही त्यालाच मिळाला होता. त्यानंतर सचिनच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजेच 24 एप्रिल 1998ला झालेल्या सामन्यात 134 धावांची खेळी करत भारताचे नाव कोका कोला कपवर कोरले आणि मालिकावीराचा किताबही स्वतःच्या नावे केला . आज त्या दिवसाला 2 वर्षे पूर्ण झाली. त्यानंतर सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खूप शतके केली पण ही दोन शतके नेहमीच प्रत्येक भारतीयांच्या मनात राहणार हे नक्की .
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
सचिन वाढदिवस विशेष लेख –
सचिन ९२वर खेळतोय रे…!!
अन् ऑस्ट्रेलियाचा दिग्गज शेन वॉर्नने बड्डे बॉय सचिनचा घेतला ऑटोग्राफ
भारत पाकिस्तान सामना म्हटलं की सचिनच्या…
इंडियन प्रीमियर लीगमध्ये सचिन सचिनसारखाच खेळला
वाढदिवस विशेष: सचिन- क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…