---Advertisement---

कट्टर आरसीबीप्रेमी! विराटच्या टीमचे नाव कोरत सचिनची जबरदस्त हेयरस्टाईल, चाहत्यांना खूपच आवडली

On: गुरूवार, सप्टेंबर 16, 2021 1:08 PM
---Advertisement---

येत्या १९ सप्टेंबरपासून जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग, इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांना प्रारंभ होणार आहे. हे सामने युएईमध्ये पार पडणार आहे. आयपीएल २०२१ स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातील सामने पार पडल्यानंतर खेळाडूंना कोरोनाची लागण होऊ लागली होती. ज्यामुळे बीसीसीआय आणि आयपीएल कमिटीने स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. या स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने अप्रतिम कामगिरी केली होती. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या स्पर्धेत विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे.

या संघाचा कर्णधार विराट कोहली आपल्या हटके लूकसाठी आणि हेअरस्टाईल साठी नेहमीच चर्चेत असतो.परंतु आता विराट कोहली नव्हे तर संघातील आणखी एक खेळाडू आपल्या आगळ्यावेगळ्या हेअर स्टाईलसाठी चर्चेत आला आहे.

आयपीएल २०२१ स्पर्धेसाठी झालेल्या खेळाडूंच्या लिलावात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात सचिन बेबीला संधी देण्यात आली होती. दरम्यान स्पर्धेचा दुसरा टप्पा सुरू होण्यापूर्वी तो आपल्या हटके हेअर स्टाईलमुळे चर्चेत आला आहे. त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने आपल्या डोक्यावर आरसीबी असे लिहिले आहे. सचिन बेबीची ही हेअर स्टाईल चाहत्यांच्या पसंतीची ठरत आहे.(Sachin baby’s new hairstyle photo went viral on social media)

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ आयपीएल २०२१ च्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. त्यांनी आतापर्यंत या स्पर्धेत ७ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यांना ५ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे. तर २ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने सुरुवातीच्या ७ सामन्यात अप्रतिम कामगिरी केली आहे. अशीच कामगिरी त्यांनी येणाऱ्या सामन्यात देखील सुरू ठेवली तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला आयपीएलचे पहिलेवहिले जेतेपद मिळवता येऊ शकते. या संघात वनिंदु हसरंगा, दुश्मंता चमिरा आणि टीम डेविड यांना माघार घेतलेल्या खेळाडूंच्या जागी संधी देण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘या’ पाकिस्तानी क्रिकेटरची भारताला चेतावणी; म्हणे, ‘चॅम्पियन्स ट्रॉफीप्रमाणे टी२० विश्वचषकात धूळ चारू’

कॅरेबियन प्रीमियर लीग २०२१ला मिळाला चँपियन, शेवटच्या चेंडूवर बाजी मारत ब्रावोचा संघ बनला विजेता

कट्टर प्रतिद्वंद्वीविरुद्ध तगडा चमू! पहिल्या टी२० विश्वचषक सामन्यासाठी गंभीरने निवडलेला ‘असा’ आहे भारतीय संघ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---