सचिन तेंडुलकर गेल्या अनेक वर्षांपासून जगातील महान फलंदाजांपैकी एक आहे यात शंका नाही. त्याला क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज असेही म्हणतात. तसेच त्याच्या कामगिरीमुळे त्याला मास्टर-ब्लास्टर असं नावही देण्यात आले. प्रसंगावधान राखून तो फलंदाजीत बदल करत असे. सचिन तेंडुलकरमध्ये त्याच्या नैसर्गिक प्रतिभेशिवाय परिस्थितीची कसोटी लावून खेळ बदलण्याची क्षमताही होती.
सचिनने अनेकदा ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांसारख्या संघांविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी केली आणि त्यानेही मायदेशात तसेच परदेशातही जागतिक दर्जाच्या गोलंदाजीवर वर्चस्व गाजवले. दरम्यान, 2003 च्या उत्तरार्धात सचिनने कसोटी क्रिकेटमध्ये एक वाईट टप्पा देखील पाहिला, त्यानंतर जानेवारी 2004 मध्ये सिडनी कसोटी सामना आला, तोपर्यंत त्याने शतक न करता 13 डाव खेळले होते.
या सामन्यापूर्वी सचिन अनेकवेळा ऑफ स्टंपबाहेर बाद झाला होता. पण, ऐतिहासिक सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर सचिनने यापूर्वी कधीही न केलेले काम करण्याचा निर्णय घेतला. त्याने त्याच्या ट्रेडमार्क शॉट्सपैकी एक कव्हर ड्राइव्ह न खेळण्याचे निवडले. त्याच्या या निर्णयाचा त्याला सर्वात जास्त फायदा झाला. या सामन्यात सचिनने 241 धावांची जबरदस्त नाबाद खेळी खेळली, जी नंतर त्याची दुसरी सर्वोच्च कसोटी धावसंख्या ठरली. ते द्विशतक त्याच्या कसोटी क्रिकेटमधील सर्वात कठीण खेळींपैकी एक आहे. सचिनच्या या शतकाला 20 वर्षे पूर्ण होत आहेत.
आयसीसीने सचिनच्या या खेळीबद्दल ट्वीट केले होते. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले की, “2004 मध्ये या दिवशी, सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनीमध्ये नाबाद 241 धावांची मॅरेथॉन इनिंग खेळली आणि या डावात एकही कव्हर ड्राइव्ह खेळला नाही.”
🇮🇳 On this day in 2004, Sachin Tendulkar registered a marathon unbeaten 241 against Australia at the SCG.
And he did it without playing a single cover drive 👊 pic.twitter.com/MHI0KV6wzs
— ICC (@ICC) January 4, 2022
सिडनीमध्ये 2 ते 6 जानेवारीदरम्यान झालेला हा सामना अनिर्णित राहिला होता. या सामन्यात भारताने पहिला डाव 7 बाद 705 धावांवर घोषित केला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 474 धावांवर संपला होता. भारताने दुसरा डाव 2 बाद 211 धावांवर घोषित करत पहिल्या डावातील 231 धावांच्या आघाडीसह ऑस्ट्रेलियाला 443 धावांचे आव्हान दिले होते. या धावांचा पाठलाग करत असताना ऑस्ट्रेलियाने सामन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत 6 बाद 357 धावा केल्या होत्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कर्णधार हार्दिक कधीच हरत नाही! आधी जिंकली आयपीएल, आता चौथ्या देशाला देणार मात
सिडनीमध्ये कसोटीत लागोपाठ तीन शतके करणारा ख्वाजा केवळ चौथाच खेळाडू, यादीत एका भारतीयाचाही समावेश