---Advertisement---

मंकडींगच्या नियमात बदल झाल्याने विभागली दिग्गजांची मतं; सचिनचा पाठिंबा, तर ब्रॉड म्हणतोय…

On: गुरूवार, मार्च 10, 2022 5:16 PM
R-Ashwin-Jos-Buttler
---Advertisement---

मेरिलबोन क्रिकेट क्लबने (एमसीसी) आता मांकडींग बाद प्रकाराला वैध करार दिली आहे. एमसीसी समिती खेळाच्या नियमांचे संरक्षण आणि सुधारणा करण्याचे काम करते. त्यांनी मांकडींगचे नाव बदलून रन आउट करण्याचा निर्णय घेतला आहे आणि अशाप्रकारे खेळाडूंना बाद करणे योग्य असल्याचे सांगितले आहे. याच पार्श्वभूमीवर भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याने या निर्णयाचे कौतुक केले, तर दुसरीकडे इंंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याने मात्र हा निर्णय चुकीचा असल्याचे सांगितले.

मांकडींग हा खेळाडूला बाद करण्याचा असा प्रकार आहे, ज्यामध्ये गोलंदाज चेंडू टाकण्याच्या आधीच फलंदाजाची विकेट घेऊ शकतो. गोलंदाज जेव्हा चेंडू टाकण्यासाठी धावत येतो, तेव्हा अनेकदा नॉन स्ट्राइकवरील फलंदाज आधीच क्रिजच्या पुढे निघालेला असतो. अशात काही वेळा गोलंदाज चेंडू हातातून सोडण्याऐवजी तो स्टंपला लावतो. या पद्धतीच्या विकेटला यापूर्वी मंकडींग असे म्हणले जात होते. असे असले तरी, अनेक जणांचा याला विरोध देखील झाला आहे.

भारतीय दिग्गज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्या मते अशाप्रकारे विकेट गमावल्यावर त्यासाठी मंकडींग या शब्दाचा वापर करणे योग्य वाटत नव्हते. सचिन म्हणाला की, तो अशाप्रकारे बाद झाल्यावर त्यासाठी मंकडींग शब्दाचा उपयोग करण्याच्या विरोधात होता. व्हिडिओच्या माध्यमातून सचिन म्हणाला की, ‘एमसीसी समितीने क्रिकेटचे नवीन नियम घोषित केले आहेत आणि त्यापैकी काहींचे मी खूप समर्थन करतो. त्यातील पहिला म्हणजे मंकडींग बाद होणे आहे. मला अशाप्रकारे बाद केले गेल्यावर मंकडींग या शब्दाचा वापर करण्यासाठी अयोग्य वाटायचे.’

सचिन म्हणालe की, ‘मला प्रत्यक्षात आनंद आहे की, या शब्दाला आता धावबादमध्ये बदलले गेले आहे. माझ्या मते हे आधापासूनच धावबाद असले पाहिजे होते. त्यामुळे ही आम्हासर्वांसाठी चांगली बातमी आहे. मला हा शब्द सोईचा वाटत नव्हता, पण आता असे होणार नाही.’

दुसरीकडे स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) याच्या मते हा एमसीसीने घेतलला मंकडींगविषयीचा हा निर्णय योग्य नाही. ब्रॉडने ट्वीटमध्ये लिहिले की, ‘तर मांकडींग आता अनुचित राहिले नाही आणि बाद करण्याची ही पद्धत आता वैध बनली आहे. बाद करण्याचा हा एक वैध मार्ग नव्हता का आणि हे अन्यायकारक होते का? मला वाटते की हे अनुचित आहे आणि मी याला योग्य मानत नाही. फलंदाजाला बाद करण्यासाठी कौशल्य लागते आणि मंकडींगमध्ये कसल्याही प्रकारचे कौशल्य लागत नाही.’

बुधवारी एमसीसीने क्रिकेटच्या अनेक नियमांत बदल केले आहेत. यातील मंकडींगचा महत्त्वाचा नियम होता. एमसीसीने मंकडींगला आता धावबादच्या नियमात सामील केले आहे. त्यामुळे मंकडींगला आता धावबाद म्हणूनच ओळखला जाणार असून अशाप्रकारचे बाद करणे योग्य असल्याचे एमसीसीने स्पष्ट केले आहे.

महत्वाच्या बातम्या –

महिला विश्वचषक: हरमनप्रीतची एकाकी झुंज व्यर्थ, भारताचा न्यूझीलंडविरुद्ध मानहानिकारक पराभव 

Video: एकदम भन्नाट! पुजा वस्त्राकरच्या जबरदस्त डायरेक्ट थ्रोवर न्यूझीलंडची सुझी बेट्स रनआऊट

सलामीचा फलंदाज असणारा श्रीसंत ‘असा’ झाला वेगवान गोलंदाज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---