---Advertisement---

वयाच्या १९ व्या वर्षी सचिनने रचलेला लीड्सवर इतिहास, याच मैदानावर रंगणार तिसरी कसोटी

On: सोमवार, ऑगस्ट 23, 2021 10:03 PM
---Advertisement---

इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना बुधवारपासून (२५ ऑगस्ट) हेडिंग्ले येथील लीड्स मैदानावर खेळला जाईल. सध्याच्या भारतीय संघातील एकही खेळाडू या मैदानावर कसोटी सामना खेळलेला नाही. मात्र, या मैदानावर भारताचा सर्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडुलकर याच्या काही महत्त्वाच्या आठवणी जोडल्या गेलेल्या आहे.

यॉर्कशायरसाठी खेळणारा पहिला विदेशी खेळाडू
भारतातील सर्वकालीन महान फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या हेडिंग्ले येथील लीड्स मैदानाबाबत काही अमूल्य आठवण जोडल्या गेल्या आहेत. १९९२ मध्ये वयाच्या १९ व्या वर्षी त्याने याच मैदानावर यॉर्कशायरसाठी काउंटी पदार्पण केले होते. यॉर्कशायरसाठी खेळणारा तो पहिला विदेशी खेळाडू बनला होता. हॅम्पशायरविरूद्ध खेळल्या गेलेल्या या सामन्यात सचिनने ८६ धावांची खेळी केली होती.

सन १९९२ च्या काउंटी क्रिकेट हंगामात यॉर्कशायरकडून खेळताना सचिनने १६ सामन्यांमध्ये १०७० धावा केल्या. ज्यात १ शतक आणि ७ अर्धशतके होती. या दरम्यान त्याची सरासरी ४७ च्या आसपास राहिलेली. सचिनने यानंतर अनेक वेळा सांगितले की, १९९२ च्या काउंटी हंगामाच्या अनुभवामुळे त्याला एक चांगला फलंदाज बनण्यास मदत झाली. त्यानंतर, २००२ इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघाने या मैदानावर विजय मिळवला होता. त्या सामन्यात सचिनने शानदार शतकी खेळी केलेली.

भारतीय संघ आघाडी मोठी करण्यास उत्सुक
भारतीय संघ पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना जिंकून मालिकेत २-० अशी आघाडी घेण्यास उत्सुक आहे. विजयाची संधी असताना नॉटिंघम कसोटी पावसामुळे अनिर्णित राहिली होती. त्यानंतर लॉर्ड्स कसोटीत भारतीय संघाने उत्कृष्ट सांघिक कामगिरीच्या जोरावर विजय संपादन केला होता. सध्याच्या भारतीय संघातील एकाही खेळाडूने या मैदानावर कसोटी सामना खेळला नाही.

महत्त्वाच्या बातम्या –

तिसऱ्या कसोटीत आर अश्विनला मिळू शकते ‘प्लेइंग इलेव्हन’मध्ये संधी, जाणून घ्या काय आहे कारण

एकेकाळी ज्याच्याबरोबर झाला होता वाद, आज तोच खेळाडू उतरला जस्टीन लँगरच्या समर्थनार्थ

भारताविरुद्धच्या लीड्स कसोटीसाठी जो रूटची जय्यत तयारी, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---