---Advertisement---

विनू मंकड यांचा आयसीसीच्या ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश, मास्टर ब्लास्टरने दिल्या शुभेच्छा

On: सोमवार, जून 14, 2021 3:40 PM
---Advertisement---

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ आमने सामने असणार आहेत. या सामन्यापूर्वी रविवारी (१३ जून) आयसीसीने हॉल ऑफ फेममधील १० दिग्गज क्रिकेटपटूंची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये माजी भारतीय क्रिकेटपटू वीनू मंकड यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. ज्यावर सचिन तेंडूलकरने ट्विट करत आनंद व्यक्त केला आहे.

वीनू मंडक यांनी भारतीय कसोटी क्रिकेटमध्ये महत्वाचे योगदान दिले आहे. त्यामुळे त्यांचा आयसीसीच्या हॉल ऑफ फेमच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. या यादीत आता एकूण १०३ दिग्गज खेळाडू आहेत. वीनू मंकडपूर्वी, बिशन सिंग बेदी, कपिल देव, सुनील गावसकर, राहुल द्रविड,अनिल कुंबळे आणि सचिन तेंडुलकर यांचा देखील या यादीत समावेश करण्यात आला आहे. हा सन्मान मिळवणारे ते ७ वे भारतीय खेळाडू ठरले आहेत.

सचिनने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर ट्विट करत म्हटले की, “आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये दिग्गज भारतीय क्रिकेटपटू वीनू मंकडजी यांचे नाव समाविष्ट झाल्याबद्दल मला फार आनंद होत आहे. ते भारताच्या क्रिकेट इतिहासातील सर्वोत्कृष्ट खेळाडू होते.” (Sachin Tendulkar delighted to see vinoo Mankad in the icc hall of fame 2021)

भारतीय संघासाठी खेळले होते, ४४ कसोटी सामने
वीनू मंकड हे उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू होते. त्यांनी आपल्या कारकीर्दीत एकूण ४४ कसोटी सामने खेळले. यामध्ये त्यांनी ३१.४७ च्या सरासरीने २१०९ धावा केल्या होत्या. तसेच गोलंदाजी करताना त्यांनी ३२.३२ च्या सरासरीने एकूण १६२ गडी बाद केले होते. आक्रमक सलामी फलंदाजी करणारे वीनू मंकड डाव्या हाताचे उत्कृष्ट फिरकी गोलंदाज होते. यासोबतच ते भारतील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंपैकी एक होते. मुख्य बाब म्हणजे त्यांनी आपल्या कारकीर्दीत प्रत्येक क्रमांकावर फलंदाजी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

भुर्रर्रर्र! विकेट मिळाल्यावर गोलंदाजाचे हटके सेलिब्रेशन, चालवली मोटारसायकल

अवघ्या ८ चेंडूत युएईत आणलं वादळ, पीएसएलच्या एका सामन्यात सुपरस्टार बनला ‘हा’ पठ्ठ्या

मन जिंकलस! आफ्रिदीच्या जावयाची खेळाडू वृत्ती, बाद झालेल्या फलंदाजाचा ‘असा’ वाढवला उत्साह

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---