गेल्या दीडवर्षापासून जगातील जवळपास सर्व देश कोरोना व्हायरसच्या महामारीच्या संकटाचा सामना करत आहे. कोरोनाच्या या विळख्यात अनेक क्रिकेटपटूही अडकले आहेत. काहीदिवसांपूर्वीच मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर घरी काही दिवस एकांतवासात घालवल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता गुरुवारी (८ एप्रिल) त्याला घरी सोडण्यात आले आहे. याबद्दल स्वत: सचिन तेंडुलकरनेच माहिती दिली आहे.
सचिनने तो रुग्णालयातून घरी परत आल्यानंतर गुरुवारी ट्विट केले आहे की ‘मी घरी नुकताच परतलो आहे आणि पुढे काही दिवस मी एकांतवासात राहणार असून विश्रांती करेल आणि आजारातून बरा होईल. माझ्यासाठी केलेल्या प्रार्थनेसाठी आणि दिलेल्या शुभेच्छांसाठी मला सर्वांचे आभार मानायचे आहेत. तसेच मी वैद्यकिय टीमबद्दलही कृतज्ञता व्यक्त करतो की त्यांनी माझी चांगली काळजी घेतली आणि गेल्या वर्षभरापासून ते न थकता या कठीण काळात काम करत आहेत.’
https://twitter.com/sachin_rt/status/1380135799765807107
कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचीही ट्विटरवरुन दिली होती माहिती
सचिनने २७ मार्च रोजी त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे ट्विट करत सांगितले होते. त्याने ट्विटमध्ये म्हटले होते, ‘माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मी मागील काही काळापासून सतत चाचण्या करत होतो. काही सौम्य लक्षणे आढळल्याने मी स्वतःला घरातच क्वारंटाईन करून घेतले आहे. माझ्या कुटुंबातील इतर कोणालाही या आजाराची लागण झाली नाही.’
https://twitter.com/sachin_rt/status/1375670454162239493
या ट्विटनंतर त्याने २ एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती ट्विट करत दिली होती.
https://twitter.com/sachin_rt/status/1377853111944015873
रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये खेळलेल्या ४ भारतीय क्रिकेटपटूंना कोरोनाची लागण
खरंतर छत्तीसगढमधील रायपूर येथे ५ ते २१ मार्च दरम्यान रोड सेफ्टी वर्ल्ड सिरिज खेळवण्यात आली होती. या स्पर्धेत अनेक माजी दिग्गज खेळाडू एकत्र खेळताना दिसले होते. यात सचिनसह अनेक भारतीय क्रिकेटपटूही इंडिया लिजेंड्सकडून खेळले होते. या स्पर्धेनंतर सचिनसह युसूफ पठाण, इरफान पठाण आणि एस बद्रिनाथ या क्रिकेटपटूंचेही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे ही स्पर्धा वादात सापडली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
धोनी १४ व्या हंगामानंतर घेणार आयपीएलमधून निवृत्ती? चेन्नईच्या बड्या अधिकाऱ्याने दिले ‘हे’ उत्तर
मुंबई विरुद्ध बेंगलोर सामन्याने होणार आयपीएल २०२१ ची सुरुवात, पाहा संपूर्ण वेळापत्रक
यंदा आरसीबीला मिळणार का विजेतेपद? चाहत्याच्या प्रश्नाला मुंबई इंडियन्सच्या खेळाडूचे भन्नाट उत्तर






