---Advertisement---

पृथ्वी शाॅचा मोठा खुलासा, कोच करत होते चुकीचे मार्गदर्शन; या खेळाडूमुळे झाले करियर

On: बुधवार, एप्रिल 22, 2020 2:10 PM
---Advertisement---

भारतीय संघाच्या इतर खेळाडूंप्रमाणे युवा फलंदाज पृथ्वी शॉनेही मंंगळवारी (२१ एप्रिल) सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला. शॉचे आयपीएल फ्रंचायझी दिल्ली कॅपिटल्स संघाने लाईव्ह सेशन आयोजित केले होते. त्यामध्ये शॉने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपला आदर्श असल्याचे सांगितले.

तसेच शॉने (Prithvi Shaw) सांगितले की, तो नेहमीच सचिनप्रमाणे (Sachin Tendulkar) खेळण्याचा प्रयत्न करतो. यावेळी त्यांनी सांगितेल की, सचिनच्या एका सल्ल्यामुळे (Advice) त्याला भारतीय संघात स्थान मिळविता आले आहे.

सचिनच्या सल्ल्याबद्दल बोलताना शॉ म्हणाला की, “सचिनचा माझ्यावर मोठा प्रभाव पडला आहे. मी जेव्हा ८ वर्षांचा होतो, तेव्हा माझी आणि सचिनची भेट झाली होती. त्यांनी मला नेहमी आपला नैसर्गिक खेळ खेळण्याचा सल्ला दिला होता. त्यांनी मला परिस्थिती पाहून फलंदाजी करण्यास सांगितले होते. तसेच त्यांनी मला मैदानाच्या बाहेरही शांत राहण्यास सांगितले होते.”

यावेळी शॉने सांगितले की, अनेक प्रशिक्षक त्याला फलंदाजीची पकड बदलण्याचा सल्ला देत होते. परंतु सचिनने त्याला असे न करण्यास सांगितले होते.

फलंदाजीबद्दल बोलताना शॉ म्हणाला की, “मी फलंदाजी दरम्यान आपल्या उजव्या हाताचा अधिक वापर करतो. त्यावेळी सचिन मला म्हणाले होते की, तू तुझी फलंदाजीची पकड कधीही बदलू नको. जेव्हा मी लहान होतो, तेव्हा प्रशिक्षकांच्या सांगण्यावरून फलंदाजीची पकड बदलत होतो. परंतु सचिन यांनी सांगितल्यापासून मी माझ्या फलंदाजीची पकड कधीच बदलली नाही.”

यानंतर सौरव गांगुलीबद्दल (Sourav Ganguly) विचारलेल्या प्रश्नावर शॉने गांगुलीला आपले प्रेरणास्थान सांगितले. मागील वर्षांमध्ये गांगुली दिल्ली कॅपिटल्सचे (Delhi Capitals) मार्गदर्शक होते. त्याने गांगुलीबरोबर वेळ घालवला होता.

याबद्दल बोलताना शॉ म्हणाला की, “गांगुली यांच्याबरोबर चांगला अनुभव मिळाला. त्यांनी माझी खूप मदत केली. युवा खेळाडूंना कशाप्रकारे प्रेरित केले पाहिजे, हे त्यांंना माहिती आहे.”

शॉने आपल्या लहान कारकीर्दीतही सर्वांना खूप आश्चर्यचकीत केले आहे. त्याने भारताकडून ४ कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने ५५.८३ च्या सरासरीने एकूण ३३५ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये एक शतक आणि २ अर्धशतकांचा समावेश आहे.

याव्यतिरिक्त त्याने भारताकडून ३ वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने २८च्या सरासरीने ८४ धावा केल्या आहेत.

ट्रेंडिंग घडामोडी-

-तर भारतात होऊ शकतो टी२० विश्वचषक…

-शारजातील सचिनच्या त्या वादळी खेळीवेळीची आयसीसी वनडे क्रमवारी

-सचिन आणि शारजामधील ती वादळी खेळी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---