---Advertisement---

का झाला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर मुलगी सारासाठी भावूक?

---Advertisement---

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर नुकताच मुलगी साराच्या पदवीसमारंभासाठी लंडनमध्ये उपस्थित राहिला होता. या सोहळ्याचे फोटो त्याने सोशल मिडियावर शेअर केले आहेत.

या फोटोत सचिन आणि त्याची पत्नी अंजलीच्या चेहऱ्यावरील साराच्या यशाबद्दलचा आनंद आणि अभिमान स्पष्ट दिसत आहे. तसेच साराने या दोघांबरोबर असणाऱ्या फोटोत तीची पदवीसमारंभादरम्यानची हॅट आणि कोट घातला आहे.तर दुसऱ्या फोटोत सचिनने तिची हॅट घातली आहे

तसेच सचिनने या फोटोंना भावूक कॅप्शन दिले आहे. त्याने म्हटले आहे की “असे वाटते की तू कालच यूनिव्हर्सिटी कॉलेज आॅफ लंडनमध्ये (यूसीएल) जाण्यासाठी घर सोडले होते आणि आता तू पदवीधर झाली आहेस. अंजली आणि मला तूझा खूप अभिमान आहे. तू हे जग जिंकावं.”

सारा ही यूनिव्हर्सिटी कॉलेज आॅफ लंडन(यूसीएल) मधून वैद्यकीय पदवीधर झाली आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

इंडिया ब्ल्यू संघाने जिंकले दुलीप ट्रॉफीचे विजेतेपद

सेरेना विल्यम्स खेळणार नवव्यांदा युएस ओपनच्या अंतिम फेरीत

टाॅप ५- पाचव्या कसोटीत होणार हे खास विक्रम

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment