सेरेना विल्यम्स खेळणार नवव्यांदा युएस ओपनच्या अंतिम फेरीत

न्युयॉर्क। सहा वेळेची चॅम्पियन सेरेना विल्यम्सने तिच्या नवव्यांदा युएस ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यावेळी तिने उपांत्य सामन्यात लॅतवियाच्या अॅनास्टासिजा सेवास्तोवाला 6-3, 6-0 असे पराभूत केले.

सेरेना या सामन्यातील पहिल्या सेटमध्ये 0-2 अशी पिछाडीवर होता. मात्र तिने नंतर आपल्या अनुभवाच्या जोरावर वर्चस्व कायम ठेवले. सेवास्तोवा ही तिची पहिलीच उपांत्य फेरी खेळत होती. तसेच सेरेनाने मागील 13 पैकी 12 गेम्स जिंकले आहेत.

सेरेना रविवारी (9सप्टेंबर) अंतिम सामना जपानच्या नायोमी ओसाका विरुद्ध खेळणार आहे. ओसाकाने उपांत्य सामन्यात अमेरिकेच्या मॅडिसन कीला 6-2, 6-4ने पराभूत केले.

36 वर्षीय सेरेनाचे हे 31वे तर ओसाकाचे हे पहिलेच ग्रॅंड स्लॅम आहे. 20 वर्षीय ओसाका जपानकडून ग्रॅंड स्लॅमच्या अंतिम सामन्यात खेळणारी पहिली महिला आहे.

सेरेनाने आतापर्यंत सहा युएस ओपन जिंकल्याने तिचे एकूण 23 ग्रॅंड स्लॅम झाले आहेत. पुनरागमन करताना सेरेनाचे हे सलग दुसरे ग्रॅंड स्लॅम स्पर्धा असून एकेरीतील तिची ही 31वी ग्रॅंड स्लॅमची अंतिम फेरी आहे. जुलैमध्ये झालेल्या विम्बल्डनमध्ये सेरेना उपविजेती ठरली होती.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

टाॅप ५- पाचव्या कसोटीत होणार हे खास विक्रम

टीम इंडियाकडून पदार्पण करणाऱ्या हनुमा विहारीची अशी आहे आजवरील कामगिरी

…म्हणून अॅलिस्टर कूकला इशांत शर्माची विकेट घेतल्याचा झाला पश्चाताप

You might also like