fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

टीम इंडियाकडून पदार्पण करणाऱ्या हनुमा विहारीची अशी आहे आजवरील कामगिरी

लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात आजपासून पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना होत आहे. हा सामना केनिंग्टन ओव्हल मैदानावर सुरु आहे. या सामन्यातून 24 वर्षीय हनुमा विहारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे.

त्याला 11 जणांच्या भारतीय संघात अष्टपैलू हार्दिक पंड्या ऐवजी संधी देण्यात आली आहे. याबरोबरच तो भारताकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा 360वा खेळाडू तर कसोटीत पदार्पण करणारा 292 वा खेळाडू ठरला आहे.

जून जुलैमध्ये भारत अ संघाने केलेल्या इंग्लंड दौऱ्यात हनुमा विहारीने दमदार कामगिरी केली होती. या दौऱ्यातील विहारी हा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता.

विहारीने या दौऱ्यात 8 सामन्यात 410 धावा करताना 1 शतक आणि 2 अर्धशतके केली आहेत.

तसेच आॅगस्टमध्ये दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध पार पडलेल्या दोन चार दिवसीय कसोटी सामन्यात त्याने एक शतक आणि एक अर्धशतकासह तीन डावात 202 धावा केल्या आहेत.

विहारीची प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी झाली आहे. त्याने 63 प्रथम श्रेणी सामन्यात 15 शतके आणि 24 अर्धशतकांसह 59.79 च्या सरासरीने 5142 धावा केल्या आहेत.

तर अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये त्याने 56 सामन्यात 47.25 च्या सरासरीने 4 शतके आणि 13 अर्धशतकांसह 2268 धावा केल्या आहेत.

त्याचबरोबर तो भारताच्या 11 जणांच्या संघात खेळणारा एमएसके प्रसाद नंतरचा पहिलाच आंध्रप्रदेशचा खेळाडू ठरला आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

इंग्लंड विरुद्ध भारत: पाचव्या कसोटीसाठी अशी आहे टीम इंडिया

टाॅप ५- पाचव्या कसोटीत होणार हे खास विक्रम

 

You might also like